बँकधारकांच्या खात्यांची माहिती केवळ १0 ते २0 पैशांत उपलब्ध

By admin | Published: April 15, 2017 02:18 AM2017-04-15T02:18:51+5:302017-04-15T02:18:51+5:30

देशातील तब्बल एक कोटी बँकधारकांच्या खात्यांची संपूर्ण माहिती लीक झाली असून, प्रत्येक खात्यासाठी १0 ते २0 पैसे या दराने ती विकली जात असल्याची

Bank account details are available only in 10 to 20 paise | बँकधारकांच्या खात्यांची माहिती केवळ १0 ते २0 पैशांत उपलब्ध

बँकधारकांच्या खात्यांची माहिती केवळ १0 ते २0 पैशांत उपलब्ध

Next

नवी दिल्ली : देशातील तब्बल एक कोटी बँकधारकांच्या खात्यांची संपूर्ण माहिती लीक झाली असून, प्रत्येक खात्यासाठी १0 ते २0 पैसे या दराने ती विकली जात असल्याची धक्कादायक माहिती तपासात हे उघड झाली आहे.
दिल्लीतील ग्रेटर कैलास येथे राहणाऱ्या ८0 वर्षांच्या महिलेच्या तक्रारीनंतर तपास करत असताना हा प्रकार उघडकीस आला. महिलेच्या क्रेडिट कार्डमधून १ लाख ४६ हजार रुपये अचानक गायब झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी बँक खात्यांची माहिती पुरवणाऱ्या मोड्यूल शोधून काढले आहे. बँकेत काम करणारे कर्मचारी तसेच कॉल सेंटर्स यांच्याकडून बँक खातेधारकांची माहिती मिळवली जायची आणि ती इतक्या कमी किमतीत किली जायची, अशी अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे. पोलिसांनी या टोळीच्या प्रमुखाला मास्टरमाइंडला अटक केली असल्याची माहिती दक्षिण-पूर्व विभागाच्या दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी दिली. टोळीप्रमुखाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक कोटी लोकांच्या बँक खात्यांची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. अर्थात त्यापैकी किती माहिती विकण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अत्यंत कमी दरात विकल्या जाणाऱ्या या माहितीमध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर, नाव, जन्मदिनांक, मोबाइल क्रमांक यांचा समावेश होता. हा सर्व डाटा विभागवार होता. त्या डाटाचा आकार २0 जीबीहून अधिक आहे. हा सर्व डाटा बल्कमध्ये विकायचो, असे अटक करण्यात आलेल्या पूरण गुप्ताने पोलिसांना दिलेल्या जबानीत मान्य केले आहे. ५0 हजार लोकांचा डाटा विकण्यासाठी १् ते २0 हजार रुपये घेतले जायचे. हा सर्व डाटा मुंबईतील एका सप्लायरकडून विकत घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. (वृत्तसंस्था)

फसवण्याची पद्धत नेमकी काय?
डाटा खरेदी करणारे माहितीच्या आधारे काही जण बँक खातेधारकांना फोन करून आपण बँक कर्मचारी असल्याचे भासवतात आणि त्यांचा सीव्हीव्ही आणि ओटीपी नंबर विचारतात. तो मिळताच त्या आधारे त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात येतात.

Web Title: Bank account details are available only in 10 to 20 paise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.