30 जूनपर्यंत पॅन नंबर न दिल्यास गोठणार बँक खाते
By admin | Published: April 7, 2017 06:10 PM2017-04-07T18:10:25+5:302017-04-07T18:44:31+5:30
बँकेत व्यवहार करण्यासाठी बँकांनी आपल्या खातेदारांना 30 जूनपर्यंत आपला पॅन नंबर जामा करण्याची सूचना दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्डचा क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या खातेदारांना 30 जूनपर्यंत आपला पॅन नंबर जामा करण्याची सूचना दिली आहे. आता जर तुम्ही 30 जूनपर्यंत पॅन नंबर जमा न केल्यास तुमचे बॅक खाते बॅकेकडून गोठवण्यात येईल.
बँक खाती पँनकार्ड क्रमांकाशी जोडून घेण्यास बँकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत आता वाढ करून 30 जूनपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे. तसेच ज्या खातेदारांकडे पॅनकार्ड नाही, अशांनी फॉर्म-60 जमा करावा, असेही बँकांकडून सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात बँकांनी आपल्या ग्राहकांना पत्र पाठवून पॅनकार्ड क्रमांक किंवा फॉर्म 60 अ जवळच्या शाखेत जमा करण्यास सांगितले आहे. या पत्रांमध्ये प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्य दिशानिर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात बँक खातेदारांसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले होते.