Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; पदवीधारक हवे आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 04:05 PM2020-12-21T16:05:53+5:302020-12-21T16:08:44+5:30

Bank of Baroda Recruitment 2020-21: एलआयसी, BECIL एम्स नंतर आता बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसर पदांवर अर्ज मागविलेले आहेत.

Bank of Baroda Recruitment: Job opportunities for Graduates and fire safety officers | Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; पदवीधारक हवे आहेत

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; पदवीधारक हवे आहेत

googlenewsNext

Bank of Baroda Recruitment 2020-21: बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officers) पदांच्या जागा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदाने या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन काढले आहे. यानुसार या पदांवर ८ जानेवारी  २०२१ पर्यंत अर्ज भरायचे आहेत. इच्छुक उमेदवार बँकेची अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. 


BOB Recruitment 2020-21: पदांची संख्या
बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट अधिकारी (Recruitment of Specialist Officers) च्या एकूण 32 जागा भरायच्या आहेत. यामध्ये २७ पदे सिक्युरिटी ऑफिसर तर ५ पदे फायर ऑफिसर (Fire Officers) ची आहेत. 


Bank Of Baroda Job Vacancy शैक्षणिक अट
BOB Recruitment 2020-21 नुसार सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी उमेदवाराला मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयाची पदवी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. तर फायर ऑफिसरसाठी उमेदवाराकडे राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (NFSC) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाच्या सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग किंवा फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंगची डिग्री असणे आवश्यक आहे. 


अर्ज शुल्क
या पदांवर सामान्य आणि ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना 600 रुपये तर एससी/एसटीच्या उमेदवारांना 100 रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे. 


How to Apply for BOB Recruitment: अर्ज कसा कराल?

  • सर्वात आधी अधिकृत वेबसाईट bankofbaroda.co.in वर जा...
  • होम पेजवर करिअर लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा...
  • Bank of Baroda Career Details पेजवर नोटिफिकेशन दिसेल..
  • त्यावर Link to Apply वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकता. 
     

LICHFL Vacancy 2020: जीवन बीमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये (HFL) भरती निघाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनीपासून  असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांचे वार्षिक पे स्केल १४ लाख रुपयांपर्यंत असणार आहे. 

जर तुम्ही एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री घेतली असेल  तर तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या पदांवर अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली दिली जात आहे. 

LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज

 

ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेडमध्ये भरती

Sarkari Job Vacancy 2020: ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये नॉन फॅकल्टी ग्रुप बी व सीच्या शेकडो पदांवर भरती काढण्यात आली आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांची भोपाळच्या एम्समध्ये (AIIMS Bhopal) नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांवर केली जाणार असून १० वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. 
या पदभरतीची नोटीस बेसिलने वेबसाईटवर जारी केली आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही १० डिसेंबरपासून सुरु झाली आहे. याच्या लिंक बातमीच्या खाली देण्यात येत आहेत. 

पदांची एकूण संख्या - ७२७

पदे कोणती? 
कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, स्टेनोग्राफर, अपर व लोवर डिव्हिजन क्लार्क, स्टोअर कीपर, एडमिन ऑफिसर, असिस्टेंट इंजीनियर, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्रेरियन, मॅनेजर, डाएटीशियनसह अनेक पदांवर जागा भरण्यात येणार आहेत. 
कोणत्या पदासाठी शिक्षण, वयाची अट आदी माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी

Web Title: Bank of Baroda Recruitment: Job opportunities for Graduates and fire safety officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.