Bank of Baroda चा मोठा निर्णय; 1 मार्चपासून दोन बँकांचे IFSC कोड बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 08:00 PM2021-02-06T20:00:20+5:302021-02-06T20:01:41+5:30
Bank of Baroda : 1 एप्रिल 2019 मध्ये या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनिकरण झाले होते. ही प्रक्रिया 28 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. यानंतर विजया बँक आणि देना बँकेचे ग्राहक कायमचे बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनणार आहेत.
बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ग्राहकांसाठी मोठा अलर्ट जारी केला आहे. बँकेने एक ट्विट करून 1 मार्चपासून विजया बँक (Vijaya Bank) आणि देना बँकेचा (Dena Bank) IFSC कोड बदलणार असल्याचे म्ह्टले आहे. या दोन्ही बँकांच्या शाखांचे कोड हे 28 फेब्रुवारी 2021 पर्यंतच कार्यरत राहणार आहेत. (merge processes of Dena bank and Vijaya Bank complited by Bank of Baroda. )
1 मार्च 2021 पासून विजया बँक आणि देना बँकेसाठी नवीन आयएफएससी कोड दिले जाणार आहेत. 1 एप्रिल 2019 मध्ये या दोन्ही बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनिकरण झाले होते. ही प्रक्रिया 28 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. यानंतर विजया बँक आणि देना बँकेचे ग्राहक कायमचे बँक ऑफ बडोदाचे ग्राहक बनणार आहेत.
IFSC कोड 11 आकड्यांचा असतो. सुरुवातीचे चार अक्षर बँकेचे नाव दर्शवितात. या कोडचा वापर इलेक्ट्रॉनिक पेमेंटवेळी केला जातो. IFSC Code ऑनलाईन देखील शोधता येतो. हा कोड बँक पासबुक आणि चेकबुकवरही असतो. आता देना आणि विजया बँकेचे खातेदार नवीन कोड सोप्या पद्धतीने मिळवू शकतात असे बँकेने सांगितले आहे. जाणून घ्या कसे....
- दोन्ही बँकांच्या ग्राहकांना विलिनीकरणावेळी पत्र पाठविण्यात आली होती. यामध्ये ही माहिती दिलेली आहे.
- वेबसाईटवर जाऊन QR कोड स्कॅन करून IFSC कोड मिळविता येईल.
- कस्टमर केअर हेल्प डेस्क 1800 258 1700 वर संपर्क करून किंवा तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन कोड मिळविता येईल.
- तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरद्वारे MIGR ---- (जुन्या खाते नंबरचे शेवटचे चार अंक) एसएमएसद्नारे 8422009988 या नंबरवर पाठविल्यास IFSC कोड मिळविता येईल.
Dear customers, please make a note that the e-Vijaya and e-Dena IFSC Codes are going to be discontinued from 1st March 2021. It’s easy to obtain the new IFSC codes of the e- Vijaya and Dena branches. Simply follow the steps and experience convenience. pic.twitter.com/SgqrzwHf6e
— Bank of Baroda (@bankofbaroda) February 4, 2021
31 मार्चपर्यंत नवीन चेकबुक घ्यावे...
बँक ऑफ बडोदाने हे देखील सांगितले आहे की, ग्राहकांना आपल्या जवळच्या शाखेत जाऊन MICR कोड असलेले चेक बुक 31 मार्च 2021 पर्यंत घ्यावे. नवीन चेकबुकसाठी ऑनलाईनद्वारेदेखील अर्ज केला जाऊ शकतो. MICR कोड हा 9 आकड्यांचा असतो. तो चेकबुकवर दिलेला असतो.