सुरतमध्ये बँक महिला कर्मचाऱ्याला मारहाण, आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:07 AM2020-06-25T04:07:02+5:302020-06-25T04:07:13+5:30
सुरतमध्ये एका बँकेतील महिला कर्मचा-याला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर झळकला होता.
सुरत/ नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरतमध्ये एका बँकेतील महिला कर्मचाºयाला मारहाण केल्याप्रकरणी त्वरित कारवार्ईची मागणी केल्यानंतर सुरत पोलिसांनी आरोपी पोलीस कॉन्स्टेबलला अटक केली आहे. सुरतमध्ये एका बँकेतील महिला कर्मचा-याला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर झळकला होता.
या घटनेची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट म्हटले की, बँक कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचविण्याची कोणालाही मोकळीक नाही. याप्रकरणी आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या घटनेप्रकरणी मी सुरतचे पोलीस आयुक्त आर. बी. ब्रह्मभट्ट यांच्याशी बोलले आहे. त्यांनी आरोपी कॉन्स्टेबलला तातडीने निलंबित करण्याचे आश्वासन दिले आहे, असे निर्मला सीतारामण यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले होते. हा व्हिडिओ झळकल्यानंतर सोशल मीडियावर सुरत पोलिसांची निंदानालस्ती होत आहे. सुरत शहरातील कॅनरा बँकेच्या सारोली शाखेत ही घटना घडली.