एटीएमचे 7 लाख घेऊन पळाला बँकेचा कर्मचारी

By admin | Published: November 15, 2016 05:05 PM2016-11-15T17:05:04+5:302016-11-15T17:01:41+5:30

मोहालीमध्ये एका बँकेचा कर्मचारी तब्बल 6.98 लाखांची रोकड घेऊन फरार झाला आहे.

Bank employee of the ATM 7 lakh escaped | एटीएमचे 7 लाख घेऊन पळाला बँकेचा कर्मचारी

एटीएमचे 7 लाख घेऊन पळाला बँकेचा कर्मचारी

Next

ऑनलाइन लोकमत

मोहाली, दि. 15 - 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यामुळे लोकांना तासनतास बँकेच्या रांगेत ताटकळत उभं राहावं लागत असताना मोहालीमध्ये एका बँकेचा कर्मचारी तब्बल 6.98 लाखांची रोकड घेऊन फरार झाला आहे. त्या कर्मचारी डेराबस्सीमधल्या बँकारपूर गावातल्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी दिले होते. दरम्यान, त्या फरार व्यक्तीचं नाव तेजप्रताप सिंह भाटिया असून, तो पंजाब आणि सिंध बँकेचा सहाय्यक शाखा व्यवस्थापक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर पैसे भरण्यासाठी तेजप्रताप सिंह यांच्याकडे सुपूर्द केले होते.

दरम्यान, तेजप्रताप सिंह भाटिया यानं स्वतः गाडीतून येत असल्याचं सांगत बँकेच्या इंजिनीअर आणि सुरक्षा अधिका-याला एटीएमच्या ठिकाणी पोहोचण्यास सांगितलं. इंजिनीअर आणि सुरक्षा अधिका-यानं एटीएमच्या ठिकाणी बराच वेळ भाटियाची वाट पाहिली. मात्र भाटिया न आल्यानं अखेर त्यांनी याची कल्पना बँक मॅनेजरला दिली. बँक मॅनेजरनं भाटियाला फोन लावून पाहिला. पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता.

बँक मॅनेजरनं भाटियाची 10 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली. त्यानंतरही भाटिया हजर न झाल्यानं बँक मॅनेजरनं या प्रकरणाची तक्रार डेराबस्सी पोलीस ठाण्यात केली. डेराबस्सी पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर दिपेंदर सिंह या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पैसे घेऊन पळालेल्या भाटियाला लवकरच अटक करू, असं इन्स्पेक्टर दिपेंदर सिंह यांनी म्हटलं आहे.

Web Title: Bank employee of the ATM 7 lakh escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.