अर्थसंकल्पादरम्यान बँक कर्मचारी जाणार संपावर

By Admin | Published: February 5, 2015 02:37 AM2015-02-05T02:37:27+5:302015-02-05T02:37:27+5:30

दीर्घकाळापासून प्रलंबित पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत.

Bank employees will go on strike during budget session | अर्थसंकल्पादरम्यान बँक कर्मचारी जाणार संपावर

अर्थसंकल्पादरम्यान बँक कर्मचारी जाणार संपावर

googlenewsNext

नवी दिल्ली : दीर्घकाळापासून प्रलंबित पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. भारतीय बँक महासंघाने दिलेल्या प्रस्तावावर असमाधानी असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी २५ फेब्रुवारीपासून चार दिवसांच्या संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय बँक महासंघाने पगारवाढीचा आपला प्रस्ताव ११ टक्क्यांवरुन १२.५ टक्के आणि आज १३ टक्क्यांवर नेला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, येत्या २८ फेब्रुवारी रोजी २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे.
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स अर्थात यूएफबीयूचे समन्वयक एम.व्ही. मुरली यांनी सांगितले की, ‘भारतीय बँक महासंघाने आज वेतनवाढीत केवळ अर्ध्या टक्क्याने वाढ करून ती १३ टक्के केली आहे. हा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही.’ कामगार संघटनांनी वेतनात १९ टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे.
नॅशनल आॅर्गनायझेशन आॅफ बँक वर्कर्सचे महासचिव अश्विनी राणा यांनी सांगितले की, बँक कर्मचारी २५ ते २८ फेब्रुवारी या काळात संपावर जातील, यावर सर्वांची संमती झाली आहे. दरम्यान, हा चारदिवसीय संप झाल्यास केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तोंडावर सरकारी निधी हस्तांतरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Bank employees will go on strike during budget session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.