Shakti Bhog Bank fraud: 'शक्ती भोग'चे सीएमडी केवल कुमार यांना 'ईडी'कडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:39 PM2021-07-05T16:39:59+5:302021-07-05T16:40:55+5:30

दिल्ली स्थित 'शक्ती भोग फूड्स लिमिटेड' कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना सोमवारी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे.

Bank fraud ED arrests Shakti Bhog CMD Kewal Krishan Kumar in money laundering case | Shakti Bhog Bank fraud: 'शक्ती भोग'चे सीएमडी केवल कुमार यांना 'ईडी'कडून अटक

Shakti Bhog Bank fraud: 'शक्ती भोग'चे सीएमडी केवल कुमार यांना 'ईडी'कडून अटक

Next

दिल्ली स्थित 'शक्ती भोग फूड्स लिमिटेड' कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक केवल कृष्णन कुमार यांना सोमवारी मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) अटक केली आहे. कोट्यवधी रुपयांचा फेरफार केल्याचा आरोप केवल कुमार यांच्यावर आहे. केवल यांना अटक केल्यानंतर ईडीच्या विशेष कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आलं आणि ९ जुलैपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. (Bank fraud ED arrests Shakti Bhog CMD Kewal Krishan Kumar in money laundering case)

केवल कुमार यांना अटक करण्याआधी ईडीनं कुमार यांच्याशी संबंधित दिल्ली आणि हरियाणातील एकूण ९ ठिकाणांवर छापेमारी केली होती. यात महत्वाची कागदपत्र ईडीच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. "छापेमारीत काही महत्वाची कागदपत्रं आणि आर्थिक घोटाळ्याशी संबंधित काही डिजिटल स्वरुपातील पुरावे हाती लागले आहेत", असं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वात इतर दहा बँकांचे एकूण मिळून तब्बल ३ हजार २६९ कोटी रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी शक्ती भोग फूड्स लिमिटेड कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्ह्याची नोंद केली आहे. याचाच आधार घेत ईडीनंही याची दखल घेऊन पीएमएलए अंतर्गत गुन्ह्याची नोंद घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. 

Web Title: Bank fraud ED arrests Shakti Bhog CMD Kewal Krishan Kumar in money laundering case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.