Video: कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं भर रस्त्यात चोपलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 01:19 PM2018-10-16T13:19:14+5:302018-10-16T13:23:09+5:30
मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Next
बंगळुरु: कर्नाटकच्या दावणगेरेमध्ये घडलेल्या एका घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक महिला एका पुरुषाला मारहाण करताना दिसत आहे. समोरील व्यक्ती महिलेसमोर गयावया करते आहे. मात्र तरीदेखील महिला त्याच्या कानशिलात लगावत आहे. त्याला काठीनं चोपून काढत आहे. या व्हिडीओतील व्यक्तीचं नाव देवइया असं असून तो डीएचएफएल वित्तसंस्थेचा व्यवस्थापक आहे.
#WATCH Woman in Karnataka's Davanagere thrashes a bank manager for allegedly asking sexual favours to approve her loan (15 October) pic.twitter.com/IiiKbiEgZ9
— ANI (@ANI) October 16, 2018
व्हिडीओत मारहाण करणाऱ्या महिलेनं आधी डीएचएफएलच्या व्यवस्थापकाकडे कर्जासाठी अर्ज केला होता. मात्र त्यासाठी व्यवस्थापकानं तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. '2 लाख रुपयांचं कर्ज मंजूर करतो. मात्र त्या बदल्यात माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव,' असं या व्यवस्थापकानं म्हटलं. यामुळे संतापलेल्या महिलेनं व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली. त्यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी या घटनेचं चित्रीकरण केलं. यानंतर महिलेनं व्यवस्थापकाला पोलिसांकडे सोपवलं. पोलिसांनी या व्यवस्थापकाला अटक केली आहे.