खळबळजनक! कचऱ्यात सापडले नोटांच्या बंडलचे रॅपर आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 12:39 PM2023-10-19T12:39:52+5:302023-10-19T12:44:47+5:30

कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप आणि नोटांच्या बंडलचे रॅपर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली.

bank slips and papers found in garbage in jaipur people shocked | खळबळजनक! कचऱ्यात सापडले नोटांच्या बंडलचे रॅपर आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप

फोटो - zeenews

जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप आणि नोटांच्या बंडलचे रॅपर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली. बजाज नगर परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मोठ्या प्रमाणात रॅपर आणि स्लिप्स पाहून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांना धक्काच बसला. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे प्रवक्ते लक्ष्मीकांत भारद्वाज म्हणाले की, नोटांचे बंडल आणि शेकडो व्यवहाराच्या स्लिप्स झाकण्यासाठी वापरल्या जाणारे रॅपर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले होते. यावरून कुठूनतरी मोठ्या प्रमाणात नोटा आल्या आणि त्यांच्या स्लिप फाडून तिथे फेकल्या गेल्याचे दिसून येते. ज्या ठिकाणी हे सर्व फेकले गेले त्या ठिकाणी एका मंत्र्याचं घर आहे आणि मंत्र्याला नोटांचा हार घालण्याचा शौक आहे, म्हणजेच त्यांना नोटांची खूप आवड आहे असंही म्हटलं. 

अशोक गेहलोत सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ते म्हणाले की, राजस्थानमध्ये एकापाठोपाठ एक भ्रष्टाचाराची नवी उदाहरणे पाहायला मिळत आहेत. कधी लॉकरमध्ये सोनं, कधी लॉकरमध्ये नोटा तर कधी बँकेच्या स्लिप कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडतात. यावरून काँग्रेसने राजस्थानची कशी लूट केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

बुधवारी सकाळी जयपूरच्या बजाज नगर भागात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात काही लोकांना करोडो रुपयांच्या व्यवहाराच्या स्लिप आणि नोटांचे बंडल सापडले तेव्हा हा सर्व प्रकार दिसल्याचे सांगण्यात आले. इतके रॅपर्स आणि स्लिप्स पाहून मॉर्निंग वॉकला जाणारे लोक थांबले. त्यानंतर लोकांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासात काही स्लिप्सवर बँकेचे शिक्के असल्याचे आढळून आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bank slips and papers found in garbage in jaipur people shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.