Banking: ATMमधून पैसे काढल्यानंतर हे बटन न चुकता दाबा, अन्यथा होईल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 03:42 PM2023-04-09T15:42:42+5:302023-04-09T15:43:08+5:30
ATM Banking: डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही एटीएम मशीनमधून हवे तेव्हा पैसे काढू शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत नाही. मात्र एटीएममधून पैसे काढतेवेळी खूप खबरदारी घेतली पाहिजे
बँकेत खातं उघडल्यानंतर आता बहुतांश बँकांकडून डेबिट कार्ड दिलं जातं. डेबिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही एटीएम मशीनमधून हवे तेव्हा पैसे काढू शकता. त्यामुळे गरजेच्या वेळी पैसे काढण्यासाठी बँकेत जावं लागत नाही. मात्र एटीएममधून पैसे काढतेवेळी खूप खबरदारी घेतली पाहिजे. तसेच कॅन्सल बटणबाबतही जागरुक राहिले पाहिजे.
एटीएम मशीनमधून जेव्हा डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढले जातात. तेव्हा लोक ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर कॅन्सल बटन आवर्जुन दाबतात. कॅन्सल बटण दाबल्याने आपण प्रक्रिया पूर्ण केली आहे, आता कुणी त्यांच्या एटीएमची माहिती मिळवून त्यातून पैसे काढू शकणार नाही, असे लोकांना वाटते. आता एटीएममधून पैसे काढल्यानंतर कॅन्सल बटण दाबणे हा लोकांच्या सवयीचा भाग बनला आहे.
मात्र एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर प्रत्येक वेळी कॅन्सल बटण दाबण आवश्यक नसतं. आरबीआय आणि बँका सांगतात की, कधीही आपल्या डेबिट कार्डची पिन डेबिट कार्डवर लिहिता कामा नये.तसेच जेव्हा कधी एटीएम मशीन मधून पैसे काढत असाल तेव्हा कुणी तुमची पिन पाहत तर नाही ना याकडे कटाक्षाने लक्ष द्या.
जेव्हा एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. तेव्हा एटीएम मशीनच्या माध्यमातून माहिती डिलिट केली जाते. अशा परिस्थितीत ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यानंतर होम स्क्रिन दिसली तर कॅन्सल बटण नाही दाबले तरी हरकत नाही. मात्र जर पैसे काढल्यानंतर ट्रान्झॅक्शन कायम ठेवण्यासाठी एटीएम मशीनच्या माध्यमातून विचारले गेले, तर मात्र ते अवश्य कॅन्सल करा. अन्यथा अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.