बँकिंग सेवा पोहोचणार प्रत्येकाच्या दारापर्यंत; भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे दिल्लीत उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 06:37 AM2018-09-02T06:37:06+5:302018-09-02T06:37:31+5:30

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू. प्रत्येक नागरिकास बँकिंग सेवा त्याच्या दारापर्यंत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बँकेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.

Banking services reach everybody's door; Indian Post Payment Bank inaugurated in Delhi | बँकिंग सेवा पोहोचणार प्रत्येकाच्या दारापर्यंत; भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे दिल्लीत उद्घाटन

बँकिंग सेवा पोहोचणार प्रत्येकाच्या दारापर्यंत; भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे दिल्लीत उद्घाटन

Next

भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचू. प्रत्येक नागरिकास बँकिंग सेवा त्याच्या दारापर्यंत मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बँकेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. ही बँक कशी असेल आणि त्यातून काय सेवा मिळतील, त्याचा हा आढावा.

1.55 लाख पोस्ट कार्यालये ३१ डिसेंबरपर्यंत पोस्ट पेमेंट बँकेशी जोडण्यात येतील. पोस्ट पेमेंट बँकेच्या ६५० शाखांव्यतिरिक्त ३ हजार संपर्क केंद्रांच्या माध्यमातून लोक बँकिंग सेवा वापरू शकतील.
पोस्ट पेमेंट बँकेला देण्यात येणारे अर्थसाह्य गेल्याच आठवड्यात सरकारने ८० टक्क्यांनी वाढवून १,४३५ कोटी केले आहे. या बळावर ही पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक आणि पेटीएम पेमेंट बँक यांसारख्या मोठ्या कंपन्यांशी टक्कर देऊ शकेल.

या सुविधा
- बचत आणि चालू खाते
- पैशाचे हस्तांतरण
- थेट लाभ हस्तांतरण
- बिल आणि पेमेंट सेवा
- व्यवसाय व व्यापारी पेमेंट

एटीएम, अ‍ॅपही...
पोस्ट पेमेंट बँकेच्या सेवेचा ग्राहकांना विविध प्रकारे लाभ घेता येईल. शाखेतील काउंटर सेवा, एटीएम, मोबाइल बँकिंग अ‍ॅप, एसएमएस आणि आयव्हीआर (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) यांचा त्यात समावेश आहे.

3,00,000 कर्मचारी आणि अत्याधुनिक डिजिटल सेवा अशी अनोखी जोड घालून ही बँक सेवा देणार आहे. त्यामुळे ती प्रभावी होईल.

- १ लाखांपर्यंतच्या ठेवी ही बँक स्वीकारू शकेल. बँक कर्ज देऊ शकणार नाही. तथापि, तिसºया पक्षाची उत्पादने विकू शकेल. पंजाब नॅशनल बँकेची एजंट म्हणून बँक काम करील.

- ७ कोटी बचत खाती (पोस्टातील) पोस्ट पेमेंट बँकेत जोडली जातील. खाजगी पेमेंट बँकांच्या स्पर्धेत याचा मोठा लाभ बँकेला होईल.

Web Title: Banking services reach everybody's door; Indian Post Payment Bank inaugurated in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.