नोटाबंदीनंतर बँकांतील जमा नोटांची होणार चौकशी
By admin | Published: January 11, 2017 10:48 AM2017-01-11T10:48:18+5:302017-01-11T10:48:18+5:30
नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेल्या मोठ्या रकमांचे विश्लेषण सुरू आहे. भारतातील 50 बँक शाखामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाली आहे. यामध्ये 10 प्रमुख बँकांचा समावेश आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झालेल्या मोठ्या रकमांचे विश्लेषण सुरू आहे. भारतातील 50 बँक शाखामध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाली आहे. यामध्ये 10 प्रमुख बँकांचा समावेश आहे. काळापैसा पांढरा करण्यासाठी अनेक नवी बँक खाती आणि निष्क्रिय खात्यांचा वापर करण्यात आला. सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या तपासामध्ये हा खळबळजनक खुलासा समोर आला आहे.
नोटाबंदीनंतर मुंबईतील व्यावसायिक बँकामध्ये 13 सहकारी बँकांनी 1600 कोटी रुपये किंमतीच्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँकात जमा केल्या असल्याचे इडीने केलेल्या तपासात समोर आले आहे. दुसरीकडे सुरतमध्ये सहकारी बँकांनी 20 कोटी रुपये किंमतीच्या चलनातुन बाद केलेल्या नोटा बँक ऑफ बडोदात जमा करण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) याबाबत चौकशी करीत आहे.
नोटाबंदीनंतर २५ हजार कोटी रुपये निष्क्रिय बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. तर, देशभरात ६० लाख बँक खात्यांत दोन लाख कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. ५०० व १००० रुपयांच्या नोटा बँकात जमा करण्यासाठी जी ५० दिवसांची मुदत देण्यात आली होती त्याच मुदतीत या रकमा जमा झाल्या आहेत.