पीककर्ज वाटपात बँकांचा आखडता हात
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM2015-02-14T23:51:54+5:302015-02-14T23:51:54+5:30
रबी हंगामातील वाटपाचे उद्दिष्ट ४६ टक्यावर
Next
र ी हंगामातील वाटपाचे उद्दिष्ट ४६ टक्यावरनांदेड : जिल्हयात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया विविध बँकामार्फत सुरु असली तरी कोरड्या दुष्काळाच्या सावटामुळे वसुलीस अडचण होणार यामुळे बँकांनी आखडता हात घेतल्याचे चित्र आहे. चालू वर्षात रबीसाठी दिलेल्या एकूण २०९ कोटी ७३ लाख पीककर्जाच्या उद्दिष्टापैकी ९ फेब्रुवारी २०१५ पर्यंत विविध बँकांनी ९७ कोटी ७ लाखांचे म्हणजे अवघे ४६.२८ टक्के पीककर्ज वाटप केलेले आहे. याचा ११ हजार ३७८ शेतकरी सभासदांना लाभ मिळाला असून बहुतांश शेतकरी अद्यापही कर्जासाठी बँकात खेटे मारत आहेत. जिल्ह्याला सन २०१४-१५ या वर्षात खरीपासाठी ११८८ कोटी ४८ लाख तर रब्बीसाठी २०९ कोटी ७३ लाख असे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. खरीपात दिलेल्या उद्दिष्टापैकी १०४३ कोटी ९६ लाख रुपयांचे वाटप झाले असून एकूण उद्दिष्टाच्या ८८ टक्के वाटप आहे. यात २४५०९ नवीन सभासदांना २२५ कोटी ८ लाखाचे वाटप केले. ९ फेब्रुवारी अखेर जिल्ह्यातील २ लाख ३ हजार ८६ शेतकर्यांना ११४१ कोटी ४ लाखांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.इलाहबाद बँक-सभासद ३२, रक्कम ३४ लाख, आंध्रा बँक-सभासद ०७, रक्कम ८ लाख, बँक ऑफ बडोदा-४२१, ४ कोटी ७८ लाख, बँक ऑफ इंडिया-१००, ८६ लाख, बँक ऑफ महाराष्ट्र-३७१, ९ कोटी १२ लाख, कॅनरा बँक-२१०, १ कोटी ५ लाख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया-०१,५० हजार, कॉरपोरेशन बँक-६, १२ लाख, आयडीबीआय बँक-१४९, १ कोटी ३९ लाख, इंडियन ओव्हरीज बँक-०७,७ लाख,पंजाब ॲन्ड सिंडबँक-९,९ लाख,पंजाब नॅशनल बँक-११७,१ कोटी ३२ लाख,स्टेट बँक ऑफ हैदराबाद-सभासद ५४३३, ३६ कोटी १५ लाख, स्टेट बँक ऑफ इंडिया-१७२३, ११ कोटी ६८ लाख, स्टेट बँक ऑफ पटीयाला-११०, १ कोटी ४५ लाख, युको बँक-४०,२८ लाख, युनियन बँक ऑफ इंडिया-७५७, ९ कोटी ३३ लाख, विजया बँक-८, ९ लाख, ॲक्सीस बँक-१९,७५ लाख, एचडीएफसी-१९२,५ कोटी ५१ लाख, आयसीआयसीआय-३४,६७ लाख, महाराष्ट्र ग्रामीण बँक-सभासद १६१४, ११ कोटी ३८ लाख तर जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे १८ सभासदांना ५ लाख ५७ हजार रुपयांचे असे एकूण ११ हजार ३७८ शेतकरी सभासदांना ९७ कोटी ७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.देना बँक, ओरिएन्ट बँक, सिंडीकेट बँक, डेव्हलपमेंट क्रेडीट बँक, आयएनजी वैश्य बँक व करुर वैश्य बँक अशा सहा बँकांनी पीककर्जाचे उद्दिष्ट दिले असतांना आजपर्यंत दमडीही वाटप केलेली नाही. विविध बँकांनी कर्जवाटप केलेली टक्केवारी अशी-इलाहबाद बँक सभासद ३१.५० टक्के, आंध्रा बँक ९.६१ टक्के, बँक ऑफ बडोदा २१३.३४ टक्के, बँक ऑफ इंडिया ८.९६ टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र ८४.८५ टक्के, कॅनरा बँक ७१.३९ टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १२.६० टक्के, कॉरपोरेशन बँक ११ टक्के, आयडीबीआय बँक २१.७१ टक्के, इंडियन ओव्हरीज बँक ७.९७ टक्के,पंजाब ॲन्ड सिंडबँक ८.७९ ,पंजाब नॅशनल बँक-५७.३८, स्टेट बँक ऑफ हैदराबाद ६१.६०, स्टेट बँक ऑफ इंडिया ४४.२५, स्टेट बँक ऑफ पटीयाला १८० टक्के, युको बँक १०९.४४ टक्के, युनियन बँक ऑफ इंडिया २११.१९ टक्के, विजया बँक ८.७९ टक्के, ॲक्सीस बँक २५.६० टक्के, एचडीएफसी २७१.९५, आयसीआयसीआय ३९.७१ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक ३६.७० टक्के तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने ०.२३ टक्के असे वाटप केले आहे.