या देशांमध्ये आधीपासूनच चलनात आहेत हिंदू देवातांचे फोटो असलेल्या नोटा, एका मुस्लिम राष्ट्राचाही आहे समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 07:49 PM2022-10-26T19:49:34+5:302022-10-26T19:50:24+5:30
Currency Notes: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतातील चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाचा फोटो छापण्याचं आवाहन केल्याने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतातील चलनी नोटांवर महात्मा गांधींसोबत देवी लक्ष्मी आणि श्रीगणेशाचा फोटो छापण्याचं आवाहन केल्याने राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. असे केल्याने या देवतांचा आशीर्वाद मिळून देशाची अर्थव्यवस्था सुधरेल, असा दावा त्यांनी केला आहे. सध्या भारतातील चलनी नोटांवर एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला विविध पर्यटन स्थळांचे फोटो छापले जातात.
सध्या इंडोनेशिया हा असा एकमेव देश आहे ज्याच्या चलनी नोटीवर श्रीगणेशाचा फोटो आहे. येथील २० हजार रुपयांच्या नोटीवर श्रीगणेश विराजमान आहेत उल्लेखनीय बाब म्हणजे इंडेनेशियातील जवळपास ८८ टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे. तर हिंदूंचं प्रमाण केवळ २ टक्के एवढंच आहे. मात्र सुरुवातीच्या काळात या देशावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव असल्याने येथे हिंदू दैवता आणि प्रतीकांचा वापर अगदी सामान्य आहे.
थाय़लंड राष्ट्रीय आर्थिक आणि सामाजिक विकास बोर्डाने आपला साठावा स्थापना दिवस साजरा करताना २०११ मध्ये २० बहतचं एक नाणं जारी केलं होतं. या नाण्यावर एका बाजूला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं छायाचित्र कोरलेलं आहे.
अमेरिकेमध्ये २००१ मध्ये महर्षी महेश योगी यांच्याशी संबंधित एक एनजीओ ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीसने राजा राम मुद्रा लॉन्च केली होती. मात्र त्याचा वापर केवळ आश्रमाच्या आत किंवा आश्रमाशी संबंधित सदस्यांमध्येच केला जात होता.