एटीएमच्या सुरक्षेबाबत बँका निष्काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 04:16 AM2018-06-22T04:16:18+5:302018-06-22T04:16:18+5:30
एटीएमच्या सुरक्षा उपायांबाबत निर्देशांचे पालन करण्यात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल रिझर्व्ह बँकेने बँकांना फटकारले आहे.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : एटीएमच्या सुरक्षा उपायांबाबत निर्देशांचे पालन करण्यात होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल रिझर्व्ह बँकेने बँकांना फटकारले आहे. बँकांनी हे सुरक्षा उपाय टप्प्याटप्प्याने लागू करावेत, यासाठी निर्देश जारी केले आहेत. त्यांचे पालन करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रत्येक टप्प्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली आहे.
रिझर्व्ह बँकेने १७ एप्रिल २०१७ च्या निर्देशांचा हवाला देत कळविले आहे की, विंडो एक्सपी व दुसरे अनसपोर्टिंग आॅपरेटिंग सिस्टीम दुरुस्त करुन घ्यावीत. आरबीआयचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. रविकुमार म्हणाले की, बँका अतिशय संथपणे हे काम करत आहेत. अनसपोर्टिंग आॅपरेटिंग सिस्टीममुळे एटीएमच्या सुरक्षेला तडा जाण्याची शक्यता आहे. याचा फटका ग्राहकांना बसेल. त्यामुळे हे काम जून २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे.
बँकांतून निवृत्ती वेतन घेणाऱ्या ज्येष्ठांना मिळणाºया वागणुकीची दखल घेत रिझर्व्ह बँकेने, ज्येष्ठांशी कर्मचाºयांनी नीटच वागायला हवे, असे बँकांना कळविले आहे.