बँकांचा आज देशव्यापी संप, मात्र या बँकांचं काम सुरु

By admin | Published: February 28, 2017 09:36 AM2017-02-28T09:36:48+5:302017-02-28T12:12:12+5:30

आपल्या विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनांनी आज संपूर्ण देशभरात बँकांचा एकदिवसीय संप पुकारला आहे

Bank's nationwide exposure today, however, the banks started their work | बँकांचा आज देशव्यापी संप, मात्र या बँकांचं काम सुरु

बँकांचा आज देशव्यापी संप, मात्र या बँकांचं काम सुरु

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - आपल्या विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनांनी आज संपूर्ण देशभरात बँकांचा एकदिवसीय संप पुकारला आहे. २१ फेब्रुवारी रोजी झालेली चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशनचे (एआयबीईए) महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले होते. 
 
(बँकांचा उद्या संप)
 
सरकारच्या बँक सुधारणा धोरणाविरोधात आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, म्हणून हा संप पुकारण्यात आला असून यामुळे देशभरातील जवळपास 1 लाख 25 हजार बँक शाखा आज बंद राहणार आहेत.
 
खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक व कोटक महिंद्रा बँकेत मात्र कामकाज सुरू राहणार असून त्यांनी संपात सहभाग घेतलेला नाही. या बँकांमध्ये फक्त चेक क्लिअरन्सचे काम होणार नाही. यूएफबीयूअंतर्गत नऊ संघटना आहेत. भारतीय मजदूर संघाशी संबंधित नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्स व नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटना संपात सहभागी होणार नाहीत.
 
 
 

Web Title: Bank's nationwide exposure today, however, the banks started their work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.