बँकांच्या एनपीएमध्ये पुन्हा होऊ शकते वाढ; ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त रिझर्व्ह बँकेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:44 AM2019-12-29T01:44:19+5:302019-12-29T06:27:53+5:30

आगामी नऊ महिन्यांत बँकांच्या कुकर्जांत पुन्हा वाढ होणार आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेच्या ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त (एफएसआर) देण्यात आला आहे.

Banks' NPAs may rise again | बँकांच्या एनपीएमध्ये पुन्हा होऊ शकते वाढ; ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त रिझर्व्ह बँकेचा इशारा

बँकांच्या एनपीएमध्ये पुन्हा होऊ शकते वाढ; ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त रिझर्व्ह बँकेचा इशारा

googlenewsNext

मुंबई : कमजोर स्थूल अर्थशास्त्रीय परिस्थिती, वाढते स्लिपेज आणि कमजोर कर्जवृद्धी यामुळे आगामी नऊ महिन्यांत बँकांच्या कुकर्जांत पुन्हा वाढ होणार आहे, असा इशारा रिझर्व्ह बँकेच्या ‘वित्तीय स्थैर्य अहवाला’त (एफएसआर) देण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडून जून आणि डिसेंबर असा वर्षातून दोन वेळा ‘एफएसआर’ जाहीर केला जातो. या वर्षातील दुसरा एफएसआर रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केला. त्यात म्हटले आहे की, बँकांवरील कुकर्जाचे संकट अजून टळलेले नाही.

सकळ अ-कार्यरत मालमत्तांचे (जीएनपीए) प्रमाण सप्टेंबर २0२0 पर्यंत वाढून ९.९ टक्के होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २0१९ मध्ये ते ९.३ टक्के होते. मार्च २0१९ मध्येही ते ९.३ टक्केच होते. अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबर २0१९ ला संपलेल्या वर्षात बँकांची कर्ज वृद्धी घसरून ८.७ टक्के झाली आहे. मार्च २0१९ मध्ये ती १३.२ टक्के होती. खाजगी क्षेत्रातील बँकांनी मात्र सप्टेंबर २0१९ मध्ये दोनअंकी म्हणजेच १६.५ टक्के कर्ज वृद्धी नोंदविली आहे. रोख रकमेचा प्रचंड ओघ असलेल्या काही उद्योगांना कर्जाची गरज राहिलेली नाही. त्यांनी कर्ज घेणे बंद केल्यामुळे कर्ज वृद्धी घसरली आहे.

अहवालात म्हटले आहे की, बँकांनी कर्जवसुलीचा पाठपुरावा सुरू केला आहे. कुकर्जांच्या वसुलीसाठी नादारी व दिवाळखोरी संहितेची मदत घेतली जात आहे. बँकांकडून असे प्रयत्न सुरू असले तरीही वाढत्या एनपीएला पूर्णत: काबूत आणण्यात बँकांना अपयश आले आहे.
बदललेली स्थूल आर्थिक स्थिती, स्लिपेजमध्ये झालेली अंशत: वाढ आणि कर्ज वृद्धीतील घसरणीचा प्रभाव याचा फटका बँकांना बसणार आहे. सरकारी बँकांचा जीएनपीए सप्टेंबर २0२0 पर्यंत वाढून १३.२ टक्के होऊ शकतो. सप्टेंबर २0१९ मध्ये तो १२.७ टक्के होता. खाजगी बँकांचा जीएनपीए ३.९ टक्क्यांवरून ४.२ टक्क्यांवर जाऊ शकतो.

एटीएममधून रात्री पैसे काढण्यासाठी एसबीआयचा ओटीपी
रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत एटीएममधून पैसे काढण्यासाठी एसबीआय बँक आता ओटीपी आधारित प्रणाली सुरु करणार आहे.
१ जानेवारी २०२० पासून ही पद्धत सुरु होणार आहे. याअंतर्गत रात्रीच्या वेळी १० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेसाठी ओटीपी प्रणाली असेल.
अनधिकृत व्यवहारांपासून ग्राहकांना वाचविण्यासाठी बँक ही प्रणाली सुरू करत आहे. हा ओटीपी केवळ एका ट्रान्झेक्शनवरच काम करेल. ही प्रक्रिया अन्य बँकेच्या एटीएमवर काम करणार नाही.

Web Title: Banks' NPAs may rise again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.