सप्टेंबरपर्यंत ४ हजार कोटी देण्याच्या मल्ल्यांचा प्रस्ताव बँकांनी नाकारला

By admin | Published: April 7, 2016 11:57 AM2016-04-07T11:57:23+5:302016-04-07T11:57:36+5:30

बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी सप्टेंबरपर्यंत ४००० करोड भरण्याचा ठेवलेला प्रस्ताव बँक समूहाने नाकारला.

Banks reject proposal to pay 4,000 crores till September | सप्टेंबरपर्यंत ४ हजार कोटी देण्याच्या मल्ल्यांचा प्रस्ताव बँकांनी नाकारला

सप्टेंबरपर्यंत ४ हजार कोटी देण्याच्या मल्ल्यांचा प्रस्ताव बँकांनी नाकारला

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी सप्टेंबरपर्यंत ४००० करोड भरण्याचा ठेवलेला प्रस्ताव बँक समूहाने नाकारला आहे. बँक समूहाने आपला निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडे स्पष्ट केला आहे. 
आपल्या उद्योगसमुहातील कंपन्यांकडे थकित असलेल्या एकूण सुमारे ९००० कोटी रुपयांच्या कर्जापैकी ४००० कोटी रुपयांची परतफेड येत्या सप्टेंबरपर्यंत करण्याचा प्रस्ताव वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्या यांनी गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. मात्र विजय मल्ल्यांचा हा प्रस्ताव बँकांच्या पसंतीस पडला नसून त्यांनी तो प्रस्ताव नाकारला आहे.  विजय मल्ल्यांनी कमीत कमी ४९०० कोटी भरावेत अशी बँकांची मागणी आहे. तसंच व्याजाच्या रकमेची मागणीदेखील समोर ठेवण्यात येणार आहे' अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 
ल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. २ मार्चला विजय मल्ल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.
बँकांनी प्रस्ताव नाकारल्यानंतर किंगफिशरने नवा प्रस्ताव मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. 
 

Web Title: Banks reject proposal to pay 4,000 crores till September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.