बँकेच्या आरटीजीएस ट्रॅन्झॅक्शन सिस्टिमला सुरुंग, डिजिटल चोरट्यांनी उडवले २.३४ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:33 IST2025-01-24T13:32:30+5:302025-01-24T13:33:31+5:30
Cyber Fraud: कर्नाटकमधील विजयनगर जिल्ह्यामध्ये एका मोठ्या डिजिटल डरोड्यामुळे खळबळ उडाली आहे. इथे कुण्या व्यक्तीला नाही तर थेट एका बँकेलाच चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. या हॅकर्सनी राज्यातील प्रतिष्ठित बल्लारी जिल्हा सहकारी केंद्रीय बँक (बीडीसीसी) मधून २.३४ कोटी रुपयांची चोरी केली.

बँकेच्या आरटीजीएस ट्रॅन्झॅक्शन सिस्टिमला सुरुंग, डिजिटल चोरट्यांनी उडवले २.३४ कोटी
कर्नाटकमधील विजयनगर जिल्ह्यामध्ये एका मोठ्या डिजिटल डरोड्यामुळे खळबळ उडाली आहे. इथे कुण्या व्यक्तीला नाही तर थेट एका बँकेलाच चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. या हॅकर्सनी राज्यातील प्रतिष्ठित बल्लारी जिल्हा सहकारी केंद्रीय बँक (बीडीसीसी) मधून २.३४ कोटी रुपयांची चोरी केली. या बँकेचा कारभार हा विजयनगर आणि बल्लारी या दोन जिल्ह्यांमधून चालतो.
अगदी सिनेस्टाइल घालण्यात आलेल्या या डिजिटल दरोड्यामध्ये बँकेच्या आरटीजीएस/एनईएफटी ट्रान्झॅक्शन सिस्टिमला लक्ष्य बनवण्यात आलं. प्राथमिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार १० जानेवारी रोजी बीडीसीसी बँकेमधून आयडीबीआय बँकेमध्ये फंडाचं नियमित ट्रान्सफर होत असताना हॅकर्सनी देवाण घेवाणीसाठी तयार केलेल्या एक्सएमएल फाइलमध्ये अकाऊंट नंबर आणि आयएफएसी कोड बदलण्यात यशस्वी ठरले. तर लाभार्थ्यांची नावं तिच राहिली. अशा परिस्थितीत लाभार्थ्यांऐवजी देशातील विविध राज्यांधील २५ विविध खात्यांमध्ये पैसे वळते झाले.
१३ जानेवारी रोजी बँकेच्या अनेक शाखांनी १० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या आरटीजीएस ट्रान्स्फरची रक्कम ही आतापर्यंत लोकांच्या खात्यात पोहोचलेली नाही, अशी तक्रार केली. त्यानंतर बँकेने केलेल्या तपासामध्ये या व्यवहारांदरम्यान, ५ लााखांहून अधिक रक्कम काढण्यात आल्याचे समोर आले.
त्यानंतर बँक व्यवस्थापनाने त्वरित आरटीजीएस, एनईएफटी सेवांना स्थगित केले. तसेच होस्पोट टाऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. हे प्रकरण आता बल्लारी सीईएन पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांकडून कलम ३१८ (३) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.