बनवारीलाल पुरोहित यांचा शपथविधी
By admin | Published: August 23, 2016 05:22 AM2016-08-23T05:22:39+5:302016-08-23T05:22:39+5:30
बनवारीलाल पुरोहित यांनी सोमवारी गुवाहाटीच्या राजभवनातील दरबार हॉलमध्ये साध्या पण शानदार समारंभात आसामचे २९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली.
गुवाहाटी : नागपूरचे माजी खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांनी सोमवारी गुवाहाटीच्या राजभवनातील दरबार हॉलमध्ये साध्या पण शानदार समारंभात आसामचे २९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजित सिंग यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, विधानसभेचे अध्यक्ष रणजीतकुमार दास, पर्यावरण मंत्री प्रमिलाराणी ब्रह्मा, अन्न पुरवठामंत्री रिहोन दाईमारी, गुवाहाटी न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्य सचिव विनोदकुमार पिपेरसेनिया यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजितसिंग (उजवीकडे) सोमवारी राजभवनात पुरोहित यांना राज्यपालपदाची शपथ देताना.शपथविधीनंतर पुरोहित म्हणाले की, आसामच्या सर्व घटकांतील जनतेच्या कल्याणासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्याचे मी राज्यपाल म्हणून आश्वासन देतो.