बापरे... भारतात आहेत 33 कोटी दुष्काळग्रस्त
By admin | Published: April 19, 2016 02:36 PM2016-04-19T14:36:13+5:302016-04-19T14:36:13+5:30
देशभरातील दुष्काळग्रस्तांची संख्या 33 कोटी असल्याचे केंद्र सरकाने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - देशभरातील दुष्काळग्रस्तांची संख्या 33 कोटी असल्याचे केंद्र सरकाने आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. देशातल्या 10 राज्यांपैकी 256 जिल्ह्यांना दुष्काळाने ग्रासले असून तब्बल 33 कोटी लोकांना दुष्काळाची झळ बसल्याची माहिती केंद्राने दिली आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेसाठी या आर्थिक वर्षाचे लक्ष्य 38,500 कोटी रुपयांच्या वितरणाचे आहे. यापैकी आत्तापर्यंत 19,555 कोटी रुपये दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये वितरीत करण्यात आल्याची माहितीही केंद्र सरकाने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.
स्वराज अभियानने दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या संदर्भात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये गुजरातची आकडेवारी देण्यात आली नसून, ती का देण्यात आलेली नाही असा प्रश्न न्यायालयाने विचारला आहे.
अनेक दिवस या प्रकरणाची सुनावणी होत असूनही केंद्राने व दुश्काळग्रस्त राज्यांनी गांभीर्य दाखवले नसल्याची खरमरीत टीका याआधी सर्वोच्च न्यायालयाने केली होती.