Bappi Lahiri Death: 'प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी ऐकायचे', PM मोदींनी व्यक्त केला शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 10:12 AM2022-02-16T10:12:19+5:302022-02-16T10:13:22+5:30

PM Modi on Bappi Lahiri Death: प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन, मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Bappi Lahiri Death: 'People of every generation used to listen bappi lahiri's songs'- PM Narendra Modi | Bappi Lahiri Death: 'प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी ऐकायचे', PM मोदींनी व्यक्त केला शोक

Bappi Lahiri Death: 'प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी ऐकायचे', PM मोदींनी व्यक्त केला शोक

googlenewsNext

नवी दिल्ली: बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे निधन झाले. मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्विट करून बप्पी दांना श्रद्धांजली वाहिली. 

काय म्हणाले पीएम मोदी?
'बप्पी लहरी जी यांचे संगीत सर्वसमावेशक आणि विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. प्रत्येक पिढीतील लोक त्यांची गाणी ऐकायचे. त्यांचा मनमिळावू स्वभाव सर्वांच्या लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. ओम शांती.'

अमित शहा यांनीही शोक व्यक्त केला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही बप्पी दा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, 'प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी दा त्यांच्या अष्टपैलू गायनासाठी आणि जिवंत स्वभावासाठी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना.'

बप्पी दा अनेक दिवसांपासून आजारी होते
बप्पी लहरी हे अनेक दिवसांपासून आजारी होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये बप्पी दा यांना कोरोनाची लागण झाली होती. ओएसए (ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया) मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बप्पी दा यांनी 70-80 च्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. 80 आणि 90 च्या दशकात भारतात डिस्को संगीत लोकप्रिय करण्यात बप्पी दा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बप्पी दा यांना 1985 मध्ये 'शराबी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 

Web Title: Bappi Lahiri Death: 'People of every generation used to listen bappi lahiri's songs'- PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.