बार कौन्सिलच्यावतीने होणार वकिलांची पडताळणी

By admin | Published: August 22, 2015 12:43 AM2015-08-22T00:43:34+5:302015-08-22T00:43:34+5:30

पुणे : तोतया वकिलांना आळा बसावा या हेतूने राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सक्तीने वकिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात बार कौन्सिल ऑफ इंडियाने निर्देश दिले असून त्यानुसार प्रॅक्टिस करणारे आणि प्रॅक्टिस न करणार्‍यांची वेगळी पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड. हर्षद निंबाळकर यांनी दिली.

Bar Council attorneys' verification | बार कौन्सिलच्यावतीने होणार वकिलांची पडताळणी

बार कौन्सिलच्यावतीने होणार वकिलांची पडताळणी

Next
णे : तोतया वकिलांना आळा बसावा या हेतूने राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सक्तीने वकिलांची पडताळणी करण्यात येणार आहे. यासंदर्भात बार कौन्सिल ऑफ इंडियाने निर्देश दिले असून त्यानुसार प्रॅक्टिस करणारे आणि प्रॅक्टिस न करणार्‍यांची वेगळी पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष ॲड. हर्षद निंबाळकर यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत कोणतीही पदवी व सनद नसणार्‍या व्यक्ती वकिली करताना आढळले आहेत. शिवाजीनगर न्यायालयात आतापयंर्त १७ बनावट वकील पकडण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातही तोतया वकीलाला पकडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर वकिलांची पडताळणी करण्याचा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतला आहे. राज्यातील वकिलांची पडताळणी करण्याची जबाबदारी त्या, त्या राज्यातील बार कौन्सिलवर सोपविण्यात आली आहे.
बार कौन्सिलने राज्यातील जिल्हा, तालुका बार असोसिएशनवर त्या भागातील वकिलांची पडताळणी करण्यास सांगितले आहे. नोकरी करणार्‍या वकिलाची मात्र प्रॅक्टिस न करणार्‍या वकिलामध्ये नोंदणी करण्यात येणार आहे. वकिलांची नोंदणी केलेले प्रमाणपत्र जिल्हा, तालुका बारच्या वतीने बार कौन्सिलला देण्यात येतील. त्या प्रमाणपत्रानुसार वकिलांची यादी तयार करून ती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांपासून, उच्च न्यायालयातील वकिलांना देण्यात येणार आहे. न्यायाधीश त्यामधील क्रमांक पाहून न्यायालयातील वकिलांची खातरजमा करू शकतील, तसेच तो प्र्रॅक्टिस करतो का, हेदेखील कळणार आहे.

Web Title: Bar Council attorneys' verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.