धावत्या बसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:26 PM2022-12-14T23:26:08+5:302022-12-14T23:26:48+5:30

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संत कबीर नगर ते लखनौला प्रवाशांना घेऊन जाणारी रोडवेज एसी बसला बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.

barabanki fire broke out in a moving bus passengers saved their lives by jumping | धावत्या बसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवला जीव

file photo

Next

बाराबंकी : संत कबीर नगरहून लखनौला जाणाऱ्या रोडवेज बसला बुधवारी कोतवाली भागातील रसौली येथे भीषण आग लागली. यादरम्यान बसमधील प्रवाशांनी बसमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संत कबीर नगर ते लखनौला प्रवाशांना घेऊन जाणारी रोडवेज एसी बसला बाराबंकी जिल्ह्याच्या सीमेवर आल्यानंतर अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.

बसमध्ये बसलेल्या लोकांनी घाईघाईत बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात प्रवासी सुखरूप खाली उतरले असले तरी अनेकांचे सामान जळून राख झाले आहे. बसला आग लागल्यानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती, लखनौ-अयोध्या महामार्गावर टाटा मोटर्ससमोर अचानक बसमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. चालक व प्रवासी बसमधून खाली उतरेपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले आणि काही वेळातच बस खाक झाली. यामध्ये प्रवाशांचा जीव वाचला असला तरी यातील बहुतांश प्रवाशांचे सामान जळून राख झाले आहे.

... तर दुर्घटना घडली नसती, प्रवाशांचा आरोप
दरम्यान, बसमध्ये बसलेल्या प्रवाशांनी बस चालकावर आरोप करत बसमध्ये कोणत्याही प्रकारचे अग्निशमन उपकरण नसल्याचे सांगितले. शॉर्टसर्किटनंतर धूर निघत असताना अग्निशमन यंत्राचा वापर केला असता तर कदाचित आमचे सामान आणि बस दोन्ही वाचले असते, असे प्रवाशांनी सांगितले. तसेच, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर बसमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र तासनतास सुरू असलेल्या या बचावकार्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील लखनौकडे जाणारी लेन दोन तास ठप्प झाली होती. 

Web Title: barabanki fire broke out in a moving bus passengers saved their lives by jumping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग