बारमालकाची शक्कल! आडवाटेने वाढवले महामार्ग आणि बारमधील अंतर

By admin | Published: April 12, 2017 07:25 PM2017-04-12T19:25:56+5:302017-04-12T19:38:51+5:30

सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महारामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत मद्यविक्री करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयामुळे प्रभावित होणारे बारमालक आणि दारू विक्रेत्यांनी

Baramalkachari concept! The distance between the highways and the bar increased by the horizontal | बारमालकाची शक्कल! आडवाटेने वाढवले महामार्ग आणि बारमधील अंतर

बारमालकाची शक्कल! आडवाटेने वाढवले महामार्ग आणि बारमधील अंतर

Next
ऑनलाइन लोकमत
कोचिन, दि. 12 - सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरापर्यंत मद्यविक्री करण्यास बंदी घातली आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे प्रभावित होणारे बारमालक आणि दारू विक्रेत्यांनी  पळवाटा शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यात केरळमधील एका बारमालकाने तर नामी शक्कल लढवून बार एकही इंच मागे न हटवता बार आणि महामार्गामध्ये 500 मीटर अंतर निर्माण करण्याची किमया साधली आहे. 
यासंदर्भातील वृत्त द न्यूज मिनिटने दिले आहे. केरळमधील ऐश्वर्या रेस्टोबारच्या मालकाने बार आणि महामार्गामध्ये 500 मीटर अंतर निर्माण करण्यासाठी बारसमोरच्या मोकळ्या जागेत ठरावीक अंतरावर सिमेंटच्या भिंती टाकल्या. त्यातून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेले बारचे अंतर 500 मीटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. अशाप्रकारे या बारमालकाने आपला बार एक इंचही न हलवता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आपला बार कायदेशीर ठरवला आहे.  
भारतात दरवर्षी 1.42 लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असतो. त्या मद्यधुंद अवस्थेत वाहन चालणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असते.  महामार्गावर मद्यधुंद वाहन चालकांमुळे होणारे अपघात आणि काही स्वयंसेवी संस्थांनी दाखल केलेल्या याचिकांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने  राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून सुमारे 500 मीटर अंतरावर असलेल्या बार आणि शॉपमधून मद्यविक्री करण्यास बंदी घातली होती.  

 

Web Title: Baramalkachari concept! The distance between the highways and the bar increased by the horizontal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.