भयंकर! मास्क लावला नसल्याने पोलिसांनी मुलाच्या हातापायात ठोकला खिळा; महिलेचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:54 PM2021-05-26T19:54:02+5:302021-05-26T20:03:03+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,71,57,795 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,08,921 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,157 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,11,388 लोकांना आपला गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. अनेक ठिकाणी मास्क न वापरल्यास दंड भरावा लागत आहे. कोरोनाच्या संकटात मास्क हा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.
मास्क न लावणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. असाच एक भयंकर प्रकार समोर आला आहे. आपल्या मुलाने मास्क घातला नाही म्हणून पोलिसांनी मुलाच्या हातापायात खिळे ठोकल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. उत्तर प्रदेशातल्या बरेली शहरातली ही घटना आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, मास्क लावला नाही म्हणून तीन पोलीस आले आणि आपल्या मुलाला घेऊन गेले. अनेक तास शोधल्यानंतर हा मुलगा जखमी अवस्थेत सापडला. त्याच्या हातावर आणि पायावर खिळे ठोकले होते. बरेलीमधल्या बरादरी भागातली ही घटना आहे.
महिलेने आणि तिच्या कुटुंबाने याप्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार केली. मात्र, पोलिसांनी या मुलाला अटक करण्याची धमकी दिल्याचं म्हटलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या विषयात लक्ष घालण्याची आणि आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मुलाच्या आईने पोलिसांवर हे आरोप केलेले असतानाच अधिकाऱ्यांनी मुलगा खोटं सांगत असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास देखील सुरू असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जिवंत व्यक्तीची झाली मृतांमध्ये नोंद अन् मग झालं असं काही...#deathhttps://t.co/oBnQHcTNEU
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा
एका व्यक्तीला आपणं जिवंत आहोत हे सिद्ध करण्यासाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. अशोक नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे. शिवकुमार अहिरवार असं या व्यक्तीचं नाव असून तो गेल्या दोन महिन्यांपासून अधिकाऱ्यांकडे जाऊन आपण जिवंत असल्याचं वारंवार सांगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरीचं काम करणाऱ्या शिवकुमारने 2018 साली राज्य सरकारच्या मुख्यमंत्री जन कल्याण संबल योजनेत आपले नाव नोंदवले होते. या योजनेद्वारा सरकार असंघटित क्षेत्राच्या उन्नतीसाठी आर्थिक मदत करते. या योजनेद्वारा मुलांच्या पालन-पोषणासाठी, मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य करते.
CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! गरोदरपणातही 9 महिने रुग्णालयात केली कोरोना रुग्णांची सेवा पण...; मन सुन्न करणारी घटना #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/zD2iTbd4fu
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021