खराब झालेली कार पाहून संतप्त झाले आमदार; ड्रायव्हरला लगावली कानशिलात, केली शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 10:22 AM2023-11-01T10:22:57+5:302023-11-01T10:28:58+5:30

आमदाराने ड्रायव्हरला कानशिलात लगावली आणि शिवीगाळ केली. यानंतर ड्रायव्हरने पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला.

bareilly sp mla beats driver after seeing dirty car police registered case | खराब झालेली कार पाहून संतप्त झाले आमदार; ड्रायव्हरला लगावली कानशिलात, केली शिवीगाळ

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशातील बरेली येथे समाजवादी पक्षाचे आमदार शहजील इस्लाम (SP MLA Shahjeel Islam) यांना खराब झालेली कार पाहिल्यानंतर त्यांना राग आला. आमदाराने ड्रायव्हरला कानशिलात लगावली आणि शिवीगाळ केली. यानंतर ड्रायव्हरने पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला. बरेलीच्या जीआरपी पोलीस ठाण्यात आमदाराविरुद्ध एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार शहजील इस्लाम यांनी याप्रकरणी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. इस्लाम अलाहाबादहून बरेलीला परतले होते. ड्रायव्हर आणि गनर त्यांना घेण्यासाठी रात्रीच जंक्शनवर पोहोचले होते, पण ट्रेन सकाळी 6 वाजता पोहोचली. ड्रायव्हर आणि गनर गाडीतच झोपले. आमदार सकाळी बरेलीला पोहोचताच गाडीवर दव पडलेलं दिसलं. गाडीची काच अस्वच्छ असल्याचे पाहून आमदार संतापले. ड्रायव्हरशी गैरवर्तन करताना त्याच्यावर हातही उचलला.

याआधीही सपा आमदार शहजील इस्लाम यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टिप्पणी केली होती, त्यानंतर बरेली विकास प्राधिकरणाने त्यांच्या पेट्रोल पंपावर बुलडोझर चालवून कारवाई केली होती. जीआरपी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन पोहोचलेल्या आमदाराचा चालक धर्मेंद्र कुमार यांनी सांगितले की, तो शहजील इस्लाम यांची कार गेल्या 5-6 महिन्यांपासून चालवत आहे. आमदारांना घेण्यासाठी स्टेशनवर गेलो होतो. 

सहा वाजता आमदाराने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. ड्रायव्हरने तक्रारीत म्हटलं आहे की, मी विंडशील्ड साफ करण्यास सुरुवात केली असता आमदाराने माझ्या तोंडावर मारलं. त्यानंतर अपमानित केलं. 112 वर फोन करून पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यानंतर आमदार गाडी घेऊन निघून गेले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bareilly sp mla beats driver after seeing dirty car police registered case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.