भयंकर! विद्यार्थ्याने गणितऐवजी दुसरं पुस्तक उघडलं, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 03:46 PM2024-02-02T15:46:17+5:302024-02-02T15:47:00+5:30

शिक्षकाने वर्गातील एका विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरून इतकी मारहाण केली की मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

bareilly teacher beats student breaks head opening wrong chapter | भयंकर! विद्यार्थ्याने गणितऐवजी दुसरं पुस्तक उघडलं, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं अन्...

भयंकर! विद्यार्थ्याने गणितऐवजी दुसरं पुस्तक उघडलं, संतापलेल्या शिक्षकाने बेदम मारलं अन्...

उत्तर प्रदेशमध्येशिक्षक हैवान झाल्याची घटना घडली आहे. बरेलीमध्ये शिक्षकाने वर्गातील एका विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरून इतकी मारहाण केली की मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षकाबाबत शाळेच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली असता शाळेने काहीही कारवाई केली नाही. त्यानंतर वडिलांना पोलिसात तक्रार दाखल करून शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याची ही घटना बरेलीतील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील आलमगिरी गंज येथील शाळेतील आहे. शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थी खूप घाबरला आहे. त्याला आता शाळेत जायची भीती वाटू लागली आहे. शिक्षकाच्या मारहाणीमुळे तो जखमी झाला. शिक्षकाच्या या कृत्याबद्दल कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्याचबरोबर शाळेच्या व्यवस्थापकाने शिक्षकावर कोणतीही कारवाई न केल्याने शाळेत शिकणाऱ्या इतर मुलांच्या पालकांमध्ये नाराजी आहे.

मोहित शर्मा यांचा मुलगा अविरल शर्मा हा नववीत शिकतो. शाळेतील शिक्षकाने आपल्या मुलाला बेदम मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. मोहित यांनी सांगितलं की, गुरुवारी त्यांचा मुलगा शाळेत गेला होता. वर्गात शिक्षक उमेश यांनी आपल्या मुलाला गणित विषयाचं पुस्तक उघडण्यास सांगितलं होतं, घाईघाईत मुलाने दुसऱ्या विषयाचं पुस्तक उघडलं. या प्रकारामुळे शिक्षक संतापले आणि त्यांनी मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. 

विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की त्याचं डोकं फुटलं आणि डोक्यातून रक्त येऊ लागले. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी शाळा गाठली. शिक्षकाला कुटुंबीयांनी मुलाला मारहाण करण्याचं कारण विचारलं असता त्याने घरातील सदस्यांनाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी शिक्षकाविरोधात शहर कोतवाली पोलिसात तक्रार केली. 
 

Web Title: bareilly teacher beats student breaks head opening wrong chapter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.