आजाराला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या पाच तासानंतर पटली ओळख : पायाला गॅँगरीन व पत्नीला अर्धांगवायुचा झटका

By admin | Published: June 8, 2016 11:03 PM2016-06-08T23:03:15+5:302016-06-08T23:03:15+5:30

जळगाव : डाव्या पायाला झालेल्या गॅँगरीनमुळे त्रस्त असलेल्या विलास बारकु पाटील (वय ३८ रा.राजमालती नगर, जळगाव, मुळ रा.शिरसमणी, ता.पारोळा) या तरुणाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे अप लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली. विलास पाटील हे बांधकामावर मजूरीचे काम करायचे. सहा महिन्यापूर्वी बांधकामावर असताना डाव्या पायाला लागल्याने जखम झाली. उपचार करुनही त्यात सुधारणा होत नव्हती, त्यामुळे ते घरीच होते. अशातच पत्नी प्रतिभा यांना अर्धांगवायुचा झटका आला. त्यामुळे नैराश्यात आणखीच भर पडली. उपचाराचा खर्च पेलला जात नसल्याने त्यांना बाळद ता.पाचोरा येथे माहेरी पाठविण्यात आले होते.

Barely a teenager committed suicide after five hours, identified as a pedestrian stroke | आजाराला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या पाच तासानंतर पटली ओळख : पायाला गॅँगरीन व पत्नीला अर्धांगवायुचा झटका

आजाराला कंटाळून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या पाच तासानंतर पटली ओळख : पायाला गॅँगरीन व पत्नीला अर्धांगवायुचा झटका

Next
गाव : डाव्या पायाला झालेल्या गॅँगरीनमुळे त्रस्त असलेल्या विलास बारकु पाटील (वय ३८ रा.राजमालती नगर, जळगाव, मुळ रा.शिरसमणी, ता.पारोळा) या तरुणाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे अप लाईनवर रेल्वेखाली आत्महत्या केली. विलास पाटील हे बांधकामावर मजूरीचे काम करायचे. सहा महिन्यापूर्वी बांधकामावर असताना डाव्या पायाला लागल्याने जखम झाली. उपचार करुनही त्यात सुधारणा होत नव्हती, त्यामुळे ते घरीच होते. अशातच पत्नी प्रतिभा यांना अर्धांगवायुचा झटका आला. त्यामुळे नैराश्यात आणखीच भर पडली. उपचाराचा खर्च पेलला जात नसल्याने त्यांना बाळद ता.पाचोरा येथे माहेरी पाठविण्यात आले होते.
पाटील यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोघंही महाराणा प्रताप शाळेत शिक्षण घेतात. घरात प्रमुख कर्ता व्यक्ती अंथरुणाला खिळून असल्याने शिवाय पत्नीलाही आजार या नैराश्यात पाटील यांनी प्र्रजापत नगराजवळील रेल्वे लाईनवर रेल्वे आत्महत्या केली. खांब क्रमांक ४२०/२२, २६ दरम्यान धड व शरीर वेगळे पडलेले आढळून आले. स्टेशन मास्तर सणस यांनी पोलिसांना कळविल्याने त्यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.
मोबाईलवरून पटली ओळख
अनोळखी मृतदेह असल्यामुळे पोलिसांना ओळख पटविण्याच अवघड जात होते. लोहमार्गचे रवींद्र ठाकरे यांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे दोन तुकडे झालेला मोबाईल आढळून आला. ठाकरे यांनी त्यातील सीम कार्ड काढून स्वत:च्या मोबाईलमध्ये टाकून त्यात असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला असता तो पाटील यांच्या सासर्‍याला लागला. त्यांनी लागलीच ही माहिती पाटील यांचे मोठे भाऊ रमेश बारकु पाटील यांना कळविली. त्यांनी घटनास्थळ गाठले असता मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. पाच तासानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आहे.

Web Title: Barely a teenager committed suicide after five hours, identified as a pedestrian stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.