सहकाऱ्याच्या पत्नीची हत्या करणाऱ्या मेजरला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 04:11 PM2018-06-24T16:11:20+5:302018-06-24T16:12:34+5:30
सहकारी मेजरच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नवी दिल्ली - सहकारी मेजरच्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी आरोपी मेजर निखिल राय हांडा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत शैलजा द्विवेदी हिचा पती मेजर अनिल द्विवेदी याने मेजर हांडा याच्यावर हत्येप्रकरणी संशय व्यक्त केला होता. आरोपी निखिल राय हांडा हा मेजर अनिल द्विवेदी आणि शैलजा द्विवेदी यांचा मित्र होता.
Photo of Indian Army Major Nikhil Handa who was arrested in Meerut's Daurala earlier today. He is accused of murdering wife of another Indian Army major, who was found dead with her throat slit in Delhi's Brar Square yesterday pic.twitter.com/Jo9wciI6pu
— ANI (@ANI) June 24, 2018
निखिल राय हांडा याला मीरत येथून बेड्या ठोकण्यात आल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेजर हांडा हा काही दिवसांपूर्वी नागालँडमध्ये दिसला होता. या प्रकरणी तपास करत असलेले जॉइंट कमिशनर मधुप तिवारी यांनी सांगितले की, आरोपींविरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. प्राथमिक माहितीमध्ये हा अपघात असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सखोल तपास केला असता ही हत्या असल्याचे उघड झाले." तपास करत असलेले पोलीस आता या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी मृत शैलजा हिच्या फोनमधील माहिती तपासत आहेत.
शनिवारी दुपारी बराड स्क्वेअर परिसरात एका महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली होती. सुरुवातीचे काही तास या मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. मात्र संध्याकाळी साडे चारच्या सुमारास मेजर अमित द्विवेदी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिल्यावर या मृतदेहाची ओळख पटली होती.