जेएनयूच्या वृत्तांकनावरुन बरखा दत्त यांना जीवे मारण्याची धमकी
By admin | Published: March 9, 2016 12:35 PM2016-03-09T12:35:11+5:302016-03-09T12:35:11+5:30
पत्रकार बरखा दत्त यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी केलेल्या वृत्तांकनावरुन धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ९ - पत्रकार बरखा दत्त यांनी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी केलेल्या वृत्तांकनावरुन धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. बरखा दत्ता यांनी दक्षिण दिल्लीमधील ग्रेटर कैलाश पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बरखा दत्त यांनी साकेतमधील महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर आपला जबाब नोंदवला आहे.
बरखा दत्त यांनी व्हीओआयपी (Voice Over Internet Protocol) नंबरवरुन फोन आला होता, त्यावरुन मला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. फोन करणा-याने मला फोन कट करण्याआधी तीन वेळा धमकी दिली. मी नाव विचारलं मात्र त्याने काहीच उत्तर दिलं नसल्याचं बरखा दत्त यांनी तक्रारीत सांगितलं आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा नोंद केला असून तपास करत आहेत. फोन नंबर आणि सिस्टीमच्या आधारे आम्ही आऱोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. कॉलरचा आयपी क्रमांक मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Many of you asked- Yes Post FIR I appeared today at Metropolitan Magistrate Court to give a statement against stalking, death threat & abuse
— barkha dutt (@BDUTT) March 8, 2016
The court has now taken cognizance of fact that since 4th of March, I have received anonymous abusive death threats for my reportage on JNU.
— barkha dutt (@BDUTT) March 8, 2016