बडोद्यात दारूपार्टी; २६१ जणांना अटक
By admin | Published: December 24, 2016 01:30 AM2016-12-24T01:30:35+5:302016-12-24T01:30:35+5:30
संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरातमधील एका दारू पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल २६१ जणांना अटक केली आहे. अटक
बडोदा : संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरातमधील एका दारू पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून तब्बल २६१ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये काही बडे उद्योजक, महिला आणि हाय-प्रोफाइल मंडळींचा समावेश आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) माजी कमिशनर चिरायु अमीन हेही त्या पार्टीला उपस्थित होते आणि त्यांचादेखील अटक झालेल्यांमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येते.
पोलिसांनी बडोद्यातील एका फार्म हाऊसमधून या सर्वांना अटक केली आहे. या फार्म हाऊसमध्ये एका विवाहाच्या निमित्ताने दारूची पार्टी सुरू होती. गुजरातमध्ये संपूर्ण दारूबंदी असतानाही तिथे सर्वांना मद्य दिले जात होते. त्यामुळे त्या सर्वांना अटक करण्यात आली आणि पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
चिरायु अमीन गुजरातमधील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. ते अलेम्बिक लिमिटेडचे चेअरमन आहेत. त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल १२00 कोटी रुपये इतका आहे. आईपीएल कमिशनर व्यतिरिक्त ते बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदीही काही काळ ते होते. (वृत्तसंस्था)