बुलेट ट्रेनची पायाभरणी सप्टेंबरमध्ये - सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:30 AM2017-08-03T03:30:15+5:302017-08-03T03:30:30+5:30

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचा पायाभरणी समारंभ पुढील महिन्यात होणार असून, त्या समारंभाला जपानचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

Base of the bullet train in September - Suresh Prabhu | बुलेट ट्रेनची पायाभरणी सप्टेंबरमध्ये - सुरेश प्रभू

बुलेट ट्रेनची पायाभरणी सप्टेंबरमध्ये - सुरेश प्रभू

Next

हरिश गुप्ता 
नवी दिल्ली : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचा पायाभरणी समारंभ पुढील महिन्यात होणार असून, त्या समारंभाला जपानचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली.
या मार्गाला १ लाख १0 हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. ही बुलेट ट्रेन २0२३ पर्यंत सुरू होईल, असेही ते म्हणाले. या रेल्वे प्रकल्पासाठी अतिशय कमी व्याजाचे कर्ज जपानने देऊ केले आहे.
वेळापत्रक कसे सांभाळणार?
४००० कर्मचाºयांना जपानतर्फेच विशेष प्रशिक्षण देण्यात येणार. त्यासाठी अहमदाबादेत संस्था. मुंबई-दिल्ली, चेन्नई-मुंबई, कोलकाता मुंबई, दिल्ली-चेन्नई व दिल्ली-कोलकाता या मार्गावर ताशी ३५0 किलोमीटर वेगाने धावणारी गाडी सुरू करण्यासाठी अभ्यास सुरू झाला आहे, असेही प्रभू म्हणाले.
दिल्ली, कानपूर, चंदीगड, नागपूर-सिकंदराबाद, मुंबई-गोवा आणि नागपूर-बिलासपूर या मार्गांवर ताशी १६0 ते २५0 किमी वेगाने धावणा-या गाड्या सुरू करणार. बुलेट ट्रेनबाबत मागील सरकारने जपानशी बोलणी सुरू केली. त्याला आमचे सरकार आल्यावर वेग आला, असे ते म्हणाले.

Web Title: Base of the bullet train in September - Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.