मूल दत्तक घेणे महागणार! शुल्कवाढीचा प्रस्ताव...
By admin | Published: May 23, 2017 07:01 AM2017-05-23T07:01:08+5:302017-05-23T07:01:08+5:30
मुलांच्या दत्तक प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या शीर्षस्थ संस्थेने देशांतर्गत दत्तकासाठी इच्छुक पालकांकडून आकारले जाणारे शुल्क ४० हजारांवरून ५५ हजार रुपये असे वाढविण्याचा प्रस्ताव केल्याने मूल दत्तक
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुलांच्या दत्तक प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या शीर्षस्थ संस्थेने देशांतर्गत दत्तकासाठी इच्छुक पालकांकडून आकारले जाणारे शुल्क ४० हजारांवरून ५५ हजार रुपये असे वाढविण्याचा प्रस्ताव केल्याने मूल दत्तक घेणे आता महाग होणार आहे.
‘चाईल्ड अॅडॉप्शन रीसोर्स अॅथॉरिटी’ (कारा) या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या शीर्षस्थ संस्थेने हा शुल्कवाढीचा प्रस्ताव केला आहे. ‘कारा’चे अध्यक्ष दीपक कुमार यांनी सांगितले की, आम्ही दत्तक शुल्कात सुधारणा करण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यावर नवे शुल्क लागू होईल.
इच्छुक पालकांकडून घेतली जाणारी सर्व रक्कम ज्या संस्थेतून मूल दत्तक दिले जाणार असेल, त्या संस्थेस दिली जाते. सध्या अशा पालकांना एकूण ४६ हजार रुपये खर्च करावे लागतात. यापैकी २४ हजार रुपये मूल पसंत करतेवेळी व १६ हजार रुपये मुलाच्या दत्तकविधानाचा आदेश होतेवेळी द्यायचे असतात. यात कोर्टाची फी व ज्या संस्थेतून मूल दत्तक घेतले असेल, त्या संस्थेस मुलाच्या देखभाल खर्चापोटी द्यायची असते. याखेरीज इच्छुक पालकांना नोंदणीसाठी एक हजार रुपये व ‘होम स्टे’साठी पाच हजार रुपयेही द्यावे लागतात.