पाकला दुसरा धक्का, भारताकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत 200% वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 09:40 PM2019-02-16T21:40:59+5:302019-02-16T21:57:06+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतानं दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारतानं दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड राष्ट्राचा दर्जा भारताकडून काढण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूवरही 200 टक्के कस्टम ड्युटी आकारली जाणार आहे. पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीमध्ये मोठी वाढ केल्यानं कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ भारताकडून घेण्यासाठी पाकिस्तानला कराच्या स्वरूपात जास्त किंमत चुकवावी लागणार आहे.
केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली आहे. भारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास 14 वस्तू निर्यात करतो. कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडणार आहे. तसेच पाकिस्तानकडून आयात करण्यात आलेल्या सिमेंटवरही भारताला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
India hikes basic customs duty on all goods imported from Pakistan to 200 per cent in the wake of the Pulwama terror attack
— ANI Digital (@ani_digital) February 16, 2019
Read @ANI story | https://t.co/4XFUrIwfpJpic.twitter.com/d7wUpXB71o
पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. तसेच दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिले. तसेच दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्तावही आज पारित करण्यात आला होता.
Upon India's withdrawal of MFN (Most Favoured Nation) status to Pakistan after the #PulwamaTerroristAttack, basic customs duty on all goods exported from Pakistan to India has been raised to 200% with immediate effect pic.twitter.com/5p75IHqA8s
— ANI (@ANI) February 16, 2019
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली असून, त्या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी तीन ठराव पास करण्यात आले.
1 : 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दु:खाच्या देशवासीयांबसोबरच सर्व पक्ष शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत., असे या ठरावात म्हटले आहे.
2 : सीमेपलीकडून दहशतवादाला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या पाठिंब्याचा आम्ही निषेध करतो.
3 : गेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत या आव्हानाचा मिळून सामना करत आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईत आम्ही सुरक्षा दलांसोबत संपूर्ण शक्तिनिशी उभे आहोत.