बायकोला शिकवण्यासाठी नवऱ्याने शेत विकलं, मजुरी केली; नोकरी लागताच 'ती' पळून गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:53 AM2023-07-18T10:53:39+5:302023-07-18T10:59:13+5:30
पतीने आरोप केला आहे की, सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने त्याला सोडण्याचा कट रचला आणि आता घटस्फोटाची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एसडीएम ज्योती मौर्या प्रकरण समोर आल्यानंतर आता पती-पत्नीमधील भांडणाच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. आता एका पतीने पत्नीविरोधात तक्रार केली आहे. पतीने आरोप केला आहे की, सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पत्नीने त्याला सोडण्याचा कट रचला आणि आता घटस्फोटाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपीच्या बस्ती जिल्ह्यातील कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या धर्मसिंहपूर गावात एसडीएम ज्योती मौर्य यांच्यासारखेच एक प्रकरण समोर आले आहे. येथे मजूर अमित कुमारने पत्नीच्या नर्सिंगच्या शिक्षणासाठी शेत विकले. काबाडकष्ट करून तिला शिक्षण दिलं, सक्षम बनवलं. पण सरकारी नोकरी मिळताच बायकोने नवऱ्याकडे पाठ फिरवली आहे.
सरकारी नोकरी मिळाल्यानंतर तिने पतीने हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अमित कुमारचं लग्न 2011 मध्ये कप्तानगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भुवनपूर गावातील अर्चनासोबत झालं होतं. लग्नानंतर सर्व काही सुरळीत झाले. दोघांनाही एक मुलगी होती. लग्नानंतर काही वर्षांनी अर्चना म्हणाली की, मला घरात काम करायचं नाही, आता मला अभ्यास करायचा आहे.
पतीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. असे असतानाही त्याने आपल्या पत्नीचा मताचा आदर केला आणि आपल्या वाट्याची जमीन विकून गोरखपूरच्या राज नर्सिंग पॅरा मेडिकल कॉलेजमध्ये तिचा प्रवेश घेतला. प्रवेश घेतल्यानंतर अर्चनाने नर्सिंगचा कोर्स करायला सुरुवात केली. पतीने पत्नीला प्रवेश मिळवून दिला आणि वसतिगृहात खोली दिली आणि तिच्या शिक्षणाचा, खाण्यापिण्याचा संपूर्ण खर्च पाठवला.
पतीने आरोप केला आहे की, एका व्यक्तीने पत्नीला अभ्यासादरम्यान प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. जेव्हा तो पत्नीला भेटायला जायचा तेव्हा धनंजय मिश्राच्या घरी भेटायचा. याबाबत त्याच्या पत्नीशी बोलले असता तिने तो आपला मित्र असल्याचे सांगितले. नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अर्चनाची श्रावस्ती जिल्ह्यातील भिंगा येथील रुग्णालयात नियुक्ती झाली. पती जेव्हा जेव्हा पत्नीला भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जात असे तेव्हा धनंजय मिश्रा त्याला घरी भेटायचा. त्याने आक्षेप घेतला असता धनंजय म्हणाला की, तू जेव्हाही घरी येशील तेव्हा आधी अर्चनाला फोन करून सांग.
अमितला पत्नी आणि धनंजयची जवळीक समजल्यावर त्याने आक्षेप घेण्यास सुरुवात केली. यानंतर धनंजयने अर्चना हिला कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट आणि हुंड्यासाठी छळाचा गुन्हा दाखल करण्यास प्रवृत्त केले. हुंडाबळीप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी अमित कोर्टात पोहोचला. मध्यस्थी केल्यानंतर तो घरी जात असताना खजुहा गावाजवळ धनंजय व त्याच्या अन्य साथीदारांनी त्याला अडवून मारहाण करून त्याचा मोबाइल हिसकावून घेतला. जीवे मारण्याची धमकी देऊन घटस्फोटासाठी दबाव टाकला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.