जागृत ग्राहकाचा हिसका, बाटा कंपनीला 3 रुपयाच्या पिशवीसाठी 9 हजारांचा दंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:36 PM2019-04-15T12:36:30+5:302019-04-15T12:36:36+5:30

ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहक मंचाने बाटा इंडिया लिमिटेड कंपनीला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Bata company has a penalty of Rs 9,000 for a bag of 3 rupees, consumer complaint of bata | जागृत ग्राहकाचा हिसका, बाटा कंपनीला 3 रुपयाच्या पिशवीसाठी 9 हजारांचा दंड 

जागृत ग्राहकाचा हिसका, बाटा कंपनीला 3 रुपयाच्या पिशवीसाठी 9 हजारांचा दंड 

googlenewsNext

चंदीगड - मॉल किंवा मोठ-मोठ्या दुकानांतून ग्राहकांना पिशवी दिल्यानंतर या पिशवीचे पैसे ग्राहकांकडून घेतले जातात. विशेष म्हणजे स्वत:च्या दुकानाचे किंवा कंपनीची जाहिराता या पिशवीच्या माध्यमातून केली जाते. मात्र, ग्राहकांना पैशाची सक्ती करून त्यांची लूट करण्यात येते. याप्रकरणी एका तक्रारीची दखल घेत, ग्राहक मंचाने बाटा कंपनीला तब्बल 9 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहक मंचाने बाटा इंडिया लिमिटेड कंपनीला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चंदिगमधील एका ग्राहकाने पिशवीसाठी तीन रुपये मागितल्याबद्दल बाटाविरोधात तक्रार केली होती. ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेत चंदिगड ग्राहक मंचाने बाटाला नऊ हजार रुपयांचा दंड ठोठावला. हे पैसे ग्राहकाला देण्याचा आदेश ग्राहक मंचाने दिले आहेत. मी 5 फेब्रुवारी रोजी बाटामधून बुट विकत घेतले होते. त्यासाठी आपल्याला 402 रुपयांचं बिल देण्यात आलं. पण, यामधील तीन रुपये पेपर बॅगसाठी आकारण्यात आले होते. त्यामुळे, दिनेश यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. आपल्याला तीन रुपये आकारत बाटा पिशवीच्या सहाय्याने आपल्या ब्रँण्डचं प्रमोशन करत होते, जे चुकीचं आहे, असे दिनेश यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच तीन रुपये परत करण्याची आणि झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई करण्याची मागणीही ग्राहकाने केली होती. 

याप्रकरणी तक्रारदाराची दखल घेत, ग्राहक मंचाने बाटा इंडियाला आपल्या सर्व ग्राहकांना मोफत पेपर बॅग देण्याचा आदेश दिला आहे. तसेच, वस्तू विकत घेतल्यानंतर संबंधित ग्राहकाला कोणतेही पैसे न आकारता पिशवी देणे ही त्या दुकानाची जबाबदारी आहे, असेही ग्राहक मंचाने सुनावले आहे. विशेष म्हणजे ग्राहक मंचाने बाटा इंडियाला पिशवीचे पैसे रिफंड करण्याचा आणि खटल्यासाठी आलेला एक हजार रुपये खर्च जमा करण्याचे आदेश दिले. तसेच ग्राहकाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल 3000 रुपये भरपाई देण्याचेही आदेशात म्हटले आहे. शिवाय राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या कायदेशीर विभागाशी संबंधित खात्यात 5 हजार रुपये डिपॉझिट करण्यासही सांगण्यात आले आहे.
 

Web Title: Bata company has a penalty of Rs 9,000 for a bag of 3 rupees, consumer complaint of bata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.