Bathinda Military Station Attack: पोलिसांनी दहा लष्करी जवानांना पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:25 AM2023-04-17T06:25:55+5:302023-04-17T06:26:23+5:30
Bathinda Military Station Attack: पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावरील चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा जवानांना नोटीस पाठवली आहे. कलम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
भटिंडा : पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावरील चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा जवानांना नोटीस पाठवली आहे. कलम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, लष्करानेही स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गनर नागा सुरेश व गनर देसाई मोहन या दोन लष्करी जवानांच्या भूमिकेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, असे पोलिसांचे मत आहे. भटिंडा छावणीचे एसएचओ गुरदीप सिंग यांनी पोलिसांनी जवानांना नोटीस पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गोळीबार प्रकरणाचा तपास लष्कर आपल्या स्तरावर करत आहे. मात्र पोलिस त्याबाबत समाधानी नाहीत.
पोलिसांचा संशय का?
अधिकाऱ्यांनी घटनेचे साक्षीदार गनर देसाई मोहन व गनर नागा सुरेश यांच्या जबाबावर संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोरांची संख्या, त्यांचे कुर्ता पायजमा घालून येणे आणि त्यांच्या एका हातात कुऱ्हाड आणि दुसऱ्या हातात रायफल असणे यावरून संशय निर्माण होतो. कारण सर्व शहीद जवानांवर गोळ्यांच्या खुणा होत्या आणि कुणावरही कुऱ्हाडीने वार केलेले नव्हते.