ई-वाहनांंच्या मार्गात बॅटरीटंचाईचा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 03:12 IST2018-07-07T03:10:31+5:302018-07-07T03:12:16+5:30
इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढण्यात लिथियम आयन बॅटरी हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ही बॅटरी तयार करणारी एकही कंपनी भारतात नसल्याची खंत केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशियन्स सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीचे महाव्यवस्थापक डी.जी. साल्पेकर यांनी व्यक्त केले.

ई-वाहनांंच्या मार्गात बॅटरीटंचाईचा अडथळा
मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढण्यात लिथियम आयन बॅटरी हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ही बॅटरी तयार करणारी एकही कंपनी भारतात नसल्याची खंत केंद्र सरकारच्या एनर्जी एफिशियन्स सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या कंपनीचे महाव्यवस्थापक डी.जी. साल्पेकर यांनी व्यक्त केले.
भारतीय उद्योग महासंघातर्फे नवरोजी गोदरेज सेंटर आॅफ मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स ही परिषद शुक्रवारी झाली. देशातील सर्व वाहने २०३० पर्यंत इलेक्ट्रिक आधारित होण्यासाठीच्या मोहिमेत केंद्र सरकारने ईईएसएलची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साल्पेकर परिषदेत उपस्थित होते.
साल्पेकर म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनात सर्वाधिक किंमत बॅटरीची असते. या बॅटरीची भारतात उपलब्धता नसल्याने वाहनांचा खर्च वाढतो. बॅटरी भारतात उपलब्ध झाल्या तर वाहनांचा खर्च कमी होण्यास मदत होईल. ती या क्षेत्रातील क्रांती असेल. बॅटरी देशात उपलब्ध झाल्या तरी दुसरी समस्या चार्जिंगच्या सोईची असेल. तेवढ्या पायाभूत सुविधा अद्याप देशात उपलब्ध नाहीत. ही मोहीम यशस्वी करण्यात हे सर्व अडथळे आहेत.
भारतीय इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र ६ टक्क्यांनी वाढत आहे. त्यामध्ये हायब्रिड व बॅटरीआधारित अशा दोन्ही प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.