बिहारचा रणसंग्राम, मतदानाला सुरुवात

By Admin | Published: October 12, 2015 09:20 AM2015-10-12T09:20:52+5:302015-10-12T09:21:42+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यातील ४९ मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे.

The battle for Bihar, the beginning of the voting | बिहारचा रणसंग्राम, मतदानाला सुरुवात

बिहारचा रणसंग्राम, मतदानाला सुरुवात

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

पाटणा, दि. १२ - बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यातील ४९ मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात मतदानाला सुरुवात झाली आहे.  पहिला तासाभरात ६ टक्के मतदान झाल्याचे वृत्त असून बांका, भागलपूर आणि समस्तीपूर येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन बिघडल्याने गोंधळाची स्थिती होती. 

बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, भागलपूर, बांका, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नवादा आणि जमूई अशा १० जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजेपर्यंत खगडिया आणि बांका येथे ७ ते ८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १ कोटी ३५ लाख मतदार पहिल्या टप्प्यात मतदान करणार असून ५८३ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पोलिस व निमलष्करी दलाचे तब्बल १ लाख ५५ हजार ०७३  जवान बंदोबस्तावर तैनात असून जिल्ह्यांवर हेलिकॉप्टर आणि ड्रोनव्दारे नजर ठेवली जात आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील जनतेने मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन ट्विटरव्दारे केले आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील बराहिया येथील मतदार केंद्रावर मतदान केले. ४९ पैकी ३४ मतदार संघात गेल्या वेळच्या निवडणुकीत महाआघाडीत म्हणजेच राजद, जदयू आणि काँग्रेसचे वर्चस्व होते. त्यामुळे हा टप्पा महाआघाडीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. 

Web Title: The battle for Bihar, the beginning of the voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.