भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 02:38 PM2024-10-03T14:38:36+5:302024-10-03T14:43:00+5:30
इस्त्रायल आज इराण, लेबनानशी संघर्ष करत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे भारताच्या मदतीनं इस्त्रायलला असं एक शहर भेट म्हणून मिळालं, जे आज त्यांची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मदत करते.
इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायल आज विविध मोर्चांवर लढत आहे. परंतु एक अशी लढाई इस्त्रायलच्या इतिहासात नोंद आहे जिथं भारताच्या मदतीने त्याला असं शहर मिळालं जे आज त्यांची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी मदत करते. या एका शहरामुळे इस्त्रायल वर्ल्ड ट्रेडमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. येणाऱ्या काळात हे शहर मोठ्या इकोनॉमिक कॉरिडोरचा एक भाग बनणार आहे.
इस्त्रायलच्या या शहराचं नाव आहे हाइफा, जे सध्या पोर्ट सिटी म्हणून ओळखलं जाते. पुढील काळात India-Middle East-Europe Corridor चा हा टप्पा असेल. या कॉरिडोरचं प्लॅनिंग भारतात झालेल्या जी २० बैठकीत झालं होते. भारतातील प्रमुख उद्योगपती गौतम अदानी यांनीही हाइफाच्या मुख्य पोर्टमध्ये १० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक केली आहे.
भारताच्या मदतीनं मिळालं 'हाइफा'
हाइफा इस्त्रायलमधील तेल अवीव आणि यरुशलमनंतर तिसरं सर्वात मोठं शहर आहे. यूरोप आणि आशिया यांच्यातील व्यापाराचा मोठा हिस्सा या शहरातील पोर्टमधून जातो. इस्त्रायलनं या शहराला भारतीय सैनिकांच्या मदतीने स्वातंत्र्य केले होते. ही गोष्ट पहिल्या जागतिक महायुद्धातील आहे. त्यावेळी भारतात ब्रिटीशांची सत्ता होती. युद्धाच्या वेळी भारतीय सैनिकांना ब्रिटीश सत्तेसोबत मिळून लढाई करावी लागत होती.
हाइफा शहराला पहिल्या महायुद्धावेळी स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी २३ सप्टेंबर १९१८ ला बॅटल ऑफ हाइफा अस्तित्वात आले. हाइफा शहरावरील ऑटोमन साम्राज्याचा अंत झाला. त्यावेळी तिथे ब्रिटीशांचा झेंडा फडकला. त्यानंतर हे शहर इस्त्रायलचा भाग झाला. इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांनी आपापल्या इतिहासात 'हाइफाच्या लढाई'ला मान दिला आहे आणि भारतीय सैनिकांच्या इतिहासाची नोंद पुस्तकांमध्ये करण्यात आली आहे. हाइफाला स्वातंत्र्य करण्यासाठी सैनिकांची जी तुकडी पाठवली होती त्याचं नाव १५ वी कॅवेलरी ब्रिगेड होतं. या लढाईतील सैनिक जोधपूर, हैदराबाद, पटियाला, म्हैसूरचं होते. तर काही सैनिक काश्मीर आणि काठियावाडचेही होते.
हाइफाची अर्थव्यवस्था
हाइफा केवळ इस्त्रायलमधील नव्हे तर भूमध्य सागरातील एक मोठं पोर्ट आहे. ज्याठिकाणची वार्षिक उलाढाल ३ कोटी टनहून अधिक आहे. इस्त्रायलमध्ये कार्गोने जितका व्यवहार होतो त्यातील ३ टक्के केवळ हाइफा पोर्टवरून होतो. मिलिट्री उत्पादने एक्सपोर्ट करण्यासाठीही हा पोर्ट महत्त्वाचा आहे. हाइफा शहर इस्त्रायलच्या कॅम्प्युटर अँन्ड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगचे हब आहे. हाइफा शहराच्या अर्थव्यवस्थेत या इंडस्ट्रीचं ११ टक्के योगदान आहे.