कमी उत्पन्न दाखवलं, कमी टॅक्स भरला; BBC ची Income Tax पुढे कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 08:41 PM2023-06-06T20:41:00+5:302023-06-06T20:45:02+5:30

बीबीसीने कमी उत्पन्न दाखवून कर कमी भरल्याचे मान्य केले आहे. 

BBC ‘accepts’ underreporting Rs 40 crore income, paying lower taxes in India | कमी उत्पन्न दाखवलं, कमी टॅक्स भरला; BBC ची Income Tax पुढे कबुली

कमी उत्पन्न दाखवलं, कमी टॅक्स भरला; BBC ची Income Tax पुढे कबुली

googlenewsNext

नवी दिल्ली: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC)ने २०१६ पासून कमी कर भरल्याचे मान्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांआधी बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली होती. यामध्ये कंपनीच्या मुंबई-दिल्ली कार्यालयांची तपासणी केल्यानंतर करचुकवेगिरीचे अनेक पुरावे देखील सापडले होते. यानंतर आता बीबीसीने कमी उत्पन्न दाखवून कर कमी भरल्याचे मान्य केले आहे. 

मिळालेल्या माहितीनूसार, बीबीसीने २०१६ ते २०२२ दरम्यान बीबीसीने ४० कोटी रुपये कमी कर भरला. त्यामुळे ४० कोटी रुपये कर जमा करण्यासाठी बीबीसीने अर्जही दाखल केला आहे. करचुकवेगिरीच्या आरोपांनंतर कंपनीने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत राहील, असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, बीबीसीच्या कार्यालयांची पाहणी केली असता, आयकर विभागाने बीबीसीने दाखवलेले उत्पन्न भारतातील कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे सांगितले होते. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बीबीसीविरोधात चौकशी सुरू केली. ईडी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट १९९९ (FEMA) चे उल्लंघन केल्याच्या आरोपांची चौकशी करत आहे.

बीबीसीच्या कार्यालयातून काय सापडले?

आयकर विभागाने असेही सांगितले की, सर्वेक्षणादरम्यान बीबीसी ग्रुपने कमी उत्पन्न दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाने म्हटले की, सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, विविध भारतीय भाषांमध्ये (इंग्रजी व्यतिरिक्त) कंटेटचा पुरेसा वापर असूनही, समूहाने दाखवलेले उत्पन्न किंवा नफा कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे म्हटले आहे. 

Web Title: BBC ‘accepts’ underreporting Rs 40 crore income, paying lower taxes in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.