प्रशासकीय पॅनलचा बीसीसीआयला दणका, दिल्लीतील कार्यालयाला टाळं

By admin | Published: February 6, 2017 01:12 PM2017-02-06T13:12:40+5:302017-02-06T13:12:40+5:30

गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत,बीसीसीआयने दिल्लीतलं कार्यालय बंद केलं आहे, तसंच बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांच्या कार्यालयालाही टाळं ठोकलं

The BCCI office of the administrative panel, avoid the office in Delhi, Delhi | प्रशासकीय पॅनलचा बीसीसीआयला दणका, दिल्लीतील कार्यालयाला टाळं

प्रशासकीय पॅनलचा बीसीसीआयला दणका, दिल्लीतील कार्यालयाला टाळं

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - नवी दिल्ली, दि. 6 - गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या नव्या प्रशासकीय पॅनलने  बीसीसीआयचं दिल्लीतलं कार्यालय बंद केलं आहे, तसंच बीसीसीआय अध्यक्ष आणि सचिवांच्या कार्यालयालाही आज टाळं ठोकण्यात आलं.
 
 या दोन्ही कार्यालयात काम करणा-या कर्मचा-यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.  सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बीसीसीआयसाठी प्रशासकीय पॅनलची घोषणा केली होती. कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय यांना पॅनलचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.  पॅनलमध्ये 4 सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती. 
 
लोढा समितीच्या शिफारशी मानण्यास नकार दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकुर आणि सचिव अजय शिर्के यांना पदावरून हटवलं होतं.  
 
 

Web Title: The BCCI office of the administrative panel, avoid the office in Delhi, Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.