बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे निधन
By admin | Published: September 20, 2015 09:57 PM2015-09-20T21:57:55+5:302015-09-20T22:23:52+5:30
हृदयविकारावरील उपचारादरम्यान बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे कोलकाता येथील बी.एम बिर्ला खाजगी रूग्नालयात निधन झाले.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २० - हृदयविकारावरील उपचारादरम्यान बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन दालमिया यांचे कोलकाता येथील बी.एम बिर्ला खाजगी रूग्नालयात निधन झाले. ते ७५ वर्षाचे होते. दालमिया यांना १७ सप्टेंबर (गुरुवार) रोजी रात्री १० वाजता हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना रूग्नालयात दाखल केला होते. काल त्यांची प्रक्रृती स्थीर होती. पण आज त्यांचे निधन झाले. जगमोहन दालमिया यांनी मार्च २०१५ मध्ये बीसीसीआई अध्यक्षपद स्विकारले होते. बीसीसीआई अध्यक्ष म्हणून ही त्यांची तिसरी वेळ होती. याआधी २००१ मध्ये ते बीसीसीआई अध्यक्ष होते. १९९७ मध्ये ते आयसीसी अध्यक्ष होते. भारताचे पहिले आयसीसी अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, सौरव गांगूली रूग्नालयात पोहचले असून ममता बनर्जी यांनी दालमियाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.