लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 05:30 AM2019-07-01T05:30:59+5:302019-07-01T05:35:02+5:30

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला.

 Be aware that democratic rights should not be lifted - Narendra Modi | लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - नरेंद्र मोदी

लोकशाही हक्क हिरावले जाऊ नयेत यासाठी सजग राहा - नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली : लोकशाहीला कोणीही गृहित धरू नये. जोपर्यंत लोकशाही हक्क हिरावून घेतले जात नाहीत तोपर्यंत त्यांचे महत्त्व कोणालाही कळत नाही. आपल्या हक्कांवर कोणी गदा आणणार नाही यासाठी जनतेने सजग राहायला हवे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकांत मोठा विजय मिळवून सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महिनाभराने नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रविवारी पुन्हा सुरु झाला. त्यात ते म्हणाले की, १९७७ साली तत्कालीन केंद्र सरकारने आणीबाणी लादून लोकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणली होती. लोकशाही प्रत्येक नागरिकाचा आदर करणे आवश्यक आहे. नेमके तेच त्या काळात झाले नव्हते.

लोकसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मोदी यांनी केदारनाथ येथील गुंफेत जाऊन ध्यानधारणा केली होती. त्याबद्दल ते म्हणाले की, तो काही राजकीय दौरा नव्हता तर स्वत:चे आत्मपरीक्षण करण्यासाठी केलेली ती कृती होती. लोकसभा निवडणुकांच्या आधी फेब्रुवारी महिन्यात प्रसारित झालेल्या मन की बातच्या शेवटच्या भागाचा प्रचारासाठी उपयोग केल्याच्या आरोपाचाही मोदी यांनी इन्कार केला. त्यांनी सांगितले की, मन की बातद्वारे जनतेशी संवाद साधायला पुन्हा येईन असे मी त्या भागात म्हटले होते. अतिआत्मविश्वासापायी मी असे उद्गार काढल्याची टीका विरोधकांनी केली होती. जनतेने विश्वास दाखविला नसता तर मी पुन्हा पंतप्रधान होऊ शकलो नसतो.

पाणी वाचविण्यासाठी तीन आवाहने
मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी जनतेला तीन आवाहने केली. स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पाण्याचा एक एक थेंब वाचविण्यासाठी लोकचळवळ उभारावी, पाणी वाचविण्यासाठी पारंपारिक ज्ञान सर्वांना प्रदान करावे तसेच पाणी वाचविण्यासाठी काम करणाºया व्यक्ती व संस्थांची माहिती सरकारला कळवावी असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. पाणी वाचवा मोहिमेसाठी जनशक्ती व जलशक्ती ही टिष्ट्वटरहँडल वापरता येतील. केंद्र सरकारने स्वतंत्र जलमंत्रालयाची स्थापना केली असली तरी ही मोहिम जनतेच्या सक्रिय सहभागामुळेच यशस्वी होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Be aware that democratic rights should not be lifted - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.