सावधान ! OLX वरुन बाईक आणि मोबाईलची चोरी

By admin | Published: June 24, 2017 05:27 PM2017-06-24T17:27:56+5:302017-06-24T17:27:56+5:30

जुनं सामान खरेदी आणि विकत घेण्यासाठी प्रसिद्द असलेल्या OLX वेबसाईटवरुन एका तरुणाला चोरांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे

Be careful! Bike and mobile theft from OLX | सावधान ! OLX वरुन बाईक आणि मोबाईलची चोरी

सावधान ! OLX वरुन बाईक आणि मोबाईलची चोरी

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - घरामध्ये, रस्त्यावर चोरी होणं काही नवीन नाही. पण आता ऑनलाइन व्यवहार करतानाही काळजी घेण्याची गरज आहे, कारण तिथेही चोर लपून बसले असल्याची शक्यता आहे. जुनं सामान खरेदी आणि विकत घेण्यासाठी प्रसिद्द असलेल्या OLX वेबसाईटवरुन एका तरुणाला चोरांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.  आपली जुनी बाईक विकण्याचा प्रयत्न करणा-या तरुणाला फसवून त्याची बाईक घेऊन चोरांनी पळ काढला. इतकंच नाही तर कॉल करण्याच्या बहाण्याने त्याचा मोबाईलही घेऊन लंपास झाले. अशा वेबसाईट्सवर अनेकदा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करत असल्याने सावधानता बाळगण्याची गरज आहे. 
 
तरुण 12 वीचा विद्यार्थी आहे. आपल्या दुचाकीला चांगली किंमत मिळेल म्हणून आशा लावून बसलेल्या या तरुणाला बाईकसोबत आपला मोबाईलही गमावावा लागला आहे. तरुणाने गोकलपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र तरुणाने सविस्तर घटना सांगण्यास सुरुवात केली आणि पोलीस संभ्रमात पडले. तरुणासोबत जबरदस्ती न करता चोरी झाली असल्याने नेमका कोणता गुन्हा दाखल करावा हे पोलिसांना समजत नव्हतं. अखेरकार कायदेशीर सल्ला घेत पोलिसांनी विश्वासघाताचा (Breach of Trust) गुन्हा दाखल केला.  
 
तरुण नेहरु विहारचा रहिवासी आहे. मोहम्मद सुहैल असं त्याचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ""त्याने 15 दिवसांपुर्वी आपली यमाहा आर-15 बाईक विकण्यासाठी वेबसाईटवर जाहिरात दिली होती. 22 जून रोजी एका तरुणाने बाईक विकत घेण्यासाठी त्याला फोन केला होता. सुहैलने 55 हजार किंमत सांगितली असता, समोरील व्यक्तीने 48 हजारात सौदा केला"". 
 
""कॉलरने शुक्रवारी सकाळी सहा वाजता सुहैलला वजीराबाद रोडवर बोलावलं. तिथे त्याला दोन तरुण भेटले. दोघेही चालत आले होते. बोलणं झाल्यानंतर त्याने टेस्ट ड्राईव्ह करायचं असल्याचं सांगत सुहैलकडून बाईकची चावी घेतली. पैसे मागवायचे असून आपल्या मोबाईलवरुन फोन लागत नाही सांगत दुस-याने सुहैलचा मोबाईल घेतला. मोबाईलवर बोलत बोलत तो पुढे चालत गेला जिथे दुसरा तरुण बाईक चालू करुन उभा होता. तिथून दोघांनीही बाईकवरुन पळ काढला"", असं पोलिसांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Be careful! Bike and mobile theft from OLX

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.