सावधान! दुसऱ्याचे पैसे खात्यात भरणे आणू शकते अडचणीत

By admin | Published: November 18, 2016 08:34 PM2016-11-18T20:34:05+5:302016-11-18T20:30:35+5:30

तुम्ही दुसऱ्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करण्याच्या विचारात असाल तर सावधान.

Be careful! Can pay someone else's money into account Troubles | सावधान! दुसऱ्याचे पैसे खात्यात भरणे आणू शकते अडचणीत

सावधान! दुसऱ्याचे पैसे खात्यात भरणे आणू शकते अडचणीत

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 -  नोटबंदीच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर काळा पैसा बाळगणाऱ्यांकडून हा पैसा टिकवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. हा पैसा बँक खात्यात भरण्यासाठी अनेकांकडून टक्केवारीसह आकर्षक प्रलोभने दाखवण्यात येत आहेत. पण तुम्हीही अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करण्याच्या विचारात असाल तर सावधान. अशी रक्कम तुम्हाला अडचणीत आणू शकते. काळा पैसा पांढरा करण्याची ही पळवाट असा पैसा भरणारे आणि भरण्यासाठी देणारे अशा दोघांनाही अडचणीची ठरू शकते, असा इशारा सरकारने दिला आहे. 
500 आणि एक हजार रुपयांच्या जुन्या  नोटा चलनातून बाद करण्यात आल्यापासूनच काळी माया गोळा करणाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. त्यातील काही जणांनी हे पैसे आपल्या ओळखीपाळखीच्या लोकांच्या खात्यात जमा करण्याची शक्कल काढली. तर काही जणांनी त्यासाठी ठरावीक रक्कम देण्याचे आमिषही दाखवले. विशेषत: शून्य शिलकीच्या जनधन खात्यांमध्येही अशी रक्कम मोठ्या प्रमाणात भरण्यात आल्याचा संशय आहे. त्यामुळेच ही चालाखी लक्षात आल्यानंतर सरकारकडून त्याविरोधात कठोर पावले उचलण्यात आली आहेत. दुसऱ्याच्या खात्यात रक्कम जमा केल्यास किंवा अशी रक्कम जमा करवून घेतल्यास संबंधितांवर आयकर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल.  

Web Title: Be careful! Can pay someone else's money into account Troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.