सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 12:23 PM2020-08-13T12:23:25+5:302020-08-13T12:24:35+5:30

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या आवासून उभी राहिली आहे. या समस्येमध्ये वाहनांच्या धुराचा मोठा वाटा आहे.

Be careful! Penalty of 10000 if not PUC; Implementation of new rules begins in Delhi | सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात

सावधान! PUC नसल्यास 10000 चा दंड; दिल्लीमध्ये नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरुवात

Next

नवी दिल्ली : गेल्या वर्षी रस्ते वाहतूक मंत्रालयाने वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी नियम अधिक कठोर केले होते. आधीचे दंड 10 पटींनी वाढवत तुरुंगवासासारख्या शिक्षेचीही तरतूद केली होती. यामध्ये वाहनाची पीयुसी नसल्यास तब्बल 10000 रुपयांचा दंड आकारला जाणार होता. याच नियमाची अंमलबजावणी दिल्ली आरटीओने सुरु केली असून आता हळूहळू देशभरातही हे नियम लागू होण्य़ाची शक्यता आहे. 


दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरूसह अनेक शहरांमध्ये प्रदुषणाची समस्या आवासून उभी राहिली आहे. या समस्येमध्ये वाहनांच्या धुराचा मोठा वाटा आहे. हिवाळ्यात दिल्लीला याचा मोठा फटका बसतो. यामुळे दिल्ली सरकारने प्रदुषण करणारी वाहने हद्दपार करण्याचे ठरविले आहे. यानुसार दिल्ली सरकारने पीयुसी प्रमाणपत्र नसल्यास वाहन चालकांना तब्बल 10000 रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेद्वारे गेल्या काही दिवसांत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून चलन फाडण्यात आले आहे. 


परिवहन विभागाने दिल्लीमध्ये 40 पथके तैनात केली आहेत. जी वाहनांचे पीयुसी प्रमाणपत्र तपासणार आहेत. दिल्लीमध्ये 13 मोठ्या प्रमाणावर प्रदुषण करणारे हॉटस्पॉट आहेत. याठिकाणी या टीम काम करणार आहेत. ही टीम वाहनांच्या इंधनाचे नमुनेही गोळा करत आहेत. त्यामध्ये कोणत्याप्रकारची भेसळ झाली आहे का, हे देखील तपासले जात आहे. 


१ सप्टेंबरला कायद्यात सुधारणा
केंद्र सरकारने 1 सप्टेंबर, 2019 मध्ये नवा मोटर वाहन सुधारणा कायदा लागू केला होता. यानुसार पीयुसी प्रमाणपत्र नसल्यास आधी 1000 रुपयांचा दंड 10000 रुपये करण्यात आला होता. या वाढीमुळे पीयुसी केंद्रांवर अचानक गर्दी होऊ लागली होती. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये निवडणुका असल्याने हे नव्या भरमसाठ दंडाचे नियम लागू करण्यात आले नव्हते. त्यानंतर गुसरातसह काही राज्यांनी ही दंडाची रक्कम कमी करत नवे नियम लागू केले होते. यानंतर कोरोना आल्याने लॉकडाऊन काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यामध्ये सूट दिली होती. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या....

लडाख! ज्याची भीती होती तेच आले; भारतासाठी अमेरिकेचे खतरनाक अण्वस्त्रधारी झेपावले

स्वातंत्र्यदिनापूर्वी देशवासियांना मोदींनी दिली मोठी भेट; करदात्यांचा होणार सन्मान

रिलायन्सला TikTok विकण्याचा प्रयत्न? सीईओ अधिकाऱ्यांना भेटल्याची चर्चा

राफेल हवेत झेपावताच चीन घाबरला; LAC वर आणली 36 बॉम्बवर्षक विमाने

तणाव वाढला, चीन नरमला! म्हणाला, अमेरिकेवर पहिली गोळी झाडणार नाही

Jio ची जबरदस्त ऑफर; अवघ्या 141 रुपयांत घेऊन जा JioPhone 2

पुन्हा बिहार! नितीश कुमार आज उद्घाटन करणार होते; मेगा ब्रिजचा रस्ताच कोसळला

Gold Rate : सोन्या, चांदीचे दर गडगडले; कोरोना व्हॅक्सिनचा प्रभाव

OMG! न्युझीलंडवर कोरोनाचा छुपा वार; 102 दिवसांनंतर 4 नवे रुग्ण, ऑकलंड लॉकडाऊन

Web Title: Be careful! Penalty of 10000 if not PUC; Implementation of new rules begins in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.