सावधान! चहामध्ये कीटकनाशके अन् रसायने; अनेक देशांकडून कठोर नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:26 AM2022-06-04T06:26:36+5:302022-06-04T06:26:57+5:30

भारतीय चहा निर्यात संघटनेचे (आयटीईए) अध्यक्ष अंशुमन कनोरिया यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

Be careful! Pesticides and chemicals in tea; Strict rules from many countries | सावधान! चहामध्ये कीटकनाशके अन् रसायने; अनेक देशांकडून कठोर नियम

सावधान! चहामध्ये कीटकनाशके अन् रसायने; अनेक देशांकडून कठोर नियम

Next

कोलकाता : चहामध्ये मर्यादेच्या पलीकडे कीटकनाशके आणि रसायने सापडत असल्याने अनेक देशांनी चहा खरेदी करण्यास नकार दिला आहे. यामुळे भारतीय चहा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

भारतीय चहा निर्यात संघटनेचे (आयटीईए) अध्यक्ष अंशुमन कनोरिया यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. जागतिक चहा बाजारात श्रीलंकेची स्थिती कमकुवत झाल्याने भारतीय व्यापारी त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. निर्यातवृद्धीसाठी  चहा  संघटना प्रयत्न करत आहे. मात्र भारतीय चहा नाकारला जात असल्याने व्यापारामध्ये घसरण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक देशांकडून कठोर नियम

अनेक देश चहा आयात करताना कठोर नियमांची अंमलबजावणी करत आहेत. ते युरोपीयन संघाच्या मानकांचे पालन करतात, हे नियम एफएसएसएआय नियमांपेक्षा अधिक कठोर आहेत.  त्यामुळे चहा उत्पादकांनी नियमांचे पालन करण्याची गरज असल्याचे कनोरिया यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Be careful! Pesticides and chemicals in tea; Strict rules from many countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.